IND vs AFG T20 WC Super-8 : कधीपासून रंगणार सुपर-8चा थरार? भारताचा पहिला सामना कोणाशी; जाणून घ्या Details

IND vs AFG, T20 World Cup 2024 Super-8 Match Live Streaming : भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपला शेवटचा गट सामना शनिवारी फ्लोरिडा येथील लॉडरहिल येथे कॅनडा विरुद्ध खेळणार होता, परंतु मैदान ओले असल्यामुळे हा सामना शेवटी रद्द करण्यात आला.
Afghanistan vs India T20 World Cup 2024 Super-8 Match
Afghanistan vs India T20 World Cup 2024 Super-8 Matchsakal
Updated on

Afghanistan vs India T20 World Cup 2024 Super-8 Match : भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपला शेवटचा गट सामना शनिवारी फ्लोरिडा येथील लॉडरहिल येथे कॅनडा विरुद्ध खेळणार होता, परंतु मैदान ओले असल्यामुळे हा सामना शेवटी रद्द करण्यात आला. हा सामना रद्द झाल्यानंतर भारत आणि कॅनडाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या एका गुणासह भारताचे 4 सामन्यांतून एकूण 7 गुण झाले आणि हा संघ अ गटातील गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिला.

Afghanistan vs India T20 World Cup 2024 Super-8 Match
Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

भारतीय क्रिकेट संघाचा अमेरिकेतील प्रवास संपला असून आता संघ वेस्ट इंडिजला जाणार आहे. आता टीम इंडियाला सुपर 8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्येच खेळायचे आहेत. भारतीय संघ सुपर 8 मध्ये पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दोन्ही संघांमध्ये स्फोटक फलंदाज, घातक वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर-8 सामन्यात रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा याबद्दल जाणून घेऊया.....

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात T20 विश्वचषकाचा सुपर-8 सामना कधी, कोठे, किती वाजता खेळवला जाईल?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर-8 सामना 20 जून (गुरुवार) रोजी ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप सुपर-8 सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तुम्ही टीव्हीवर पाहू शकता?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

Afghanistan vs India T20 World Cup 2024 Super-8 Match
INDW vs SAW Schedule: हरमनप्रीतची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, कधी अन् कुठे पाहाणार सामने; जाणून घ्या डिटेल्स

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप सुपर-8 सामना कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल?

तुम्ही भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 सामना 'Disney + Hotstar' वर डिजिटल प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहू शकता. याशिवाय https://www.esakal.com/krida वरही तुम्ही सामन्याचे लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.

सुपर 8 मधील भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 20 जून, केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस (8 PM IST)

  • भारत वि D2 - 22 जून, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा (8 PM IST)

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २४ जून, डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया (रात्री ८ नंतर)

अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-8 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.