टीम इंडियाच्या Playing-11मधून 'या' दोन खेळाडूंचा पत्ता कट? खराब फॉर्ममुळे वाढली चिंता

T20 World Cup 2024 Team India Playing XI : भारतीय संघ 5 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
T20 World Cup 2024 Team India Playing XI
T20 World Cup 2024 Team India Playing XIsakal
Updated on

T20 World Cup 2024 Team India Playing XI : भारतीय संघ 5 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. रोहित आणि कंपनीचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. याआधी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना झाला होता. जो टीम इंडियाने हा सामना 60 धावांनी जिंकला.

या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. याशिवाय उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही शानदार खेळी करत पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. तर दोन खेळाडूंनी सराव सामन्यात खराब कामगिरी करून कर्णधार रोहितला नाराज केले. आता या खेळाडूंचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होऊ शकतो.

T20 World Cup 2024 Team India Playing XI
Hardik Pandya : 'ही कठीण वेळ...' पत्नी नताशासोबत घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य

यावेळी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचीही वर्ल्ड कपसाठी संघात निवड झाली आहे. आयपीएल 2024 मध्ये संजूने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. मात्र, सराव सामन्यातच संजू फ्लॉप ठरला. टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्मासह संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली.

पण संजूने 6 चेंडूंचा सामना केला आणि केवळ एक धाव घेतली. दुसऱ्या यष्टिरक्षक फलंदाजाचा पर्याय म्हणून संजूचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या शानदार खेळीनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संजूच्या जागी पंतला संधी मिळू शकते असे दिसते.

T20 World Cup 2024 Team India Playing XI
Virat Kohli : न्यूयॉर्कमध्ये पोहोचताच विराट कोहलीचा ICCकडून खास सन्मान; शेअर केला व्हिडिओ

अष्टपैलू शिवम दुबे याचीही वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. सराव सामन्यात शिवमला बॅट आणि बॉल अशा दोन्ही प्रकारे कामगिरी करण्याची संधी मिळाली. दुबेने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली, तर फलंदाजीत पुन्हा एकदा निराशा केली. फलंदाजी करताना शिवमने 16 चेंडूत 14 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजी करताना 3 षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले. फलंदाजीतील शिवमची ही खराब कामगिरी त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढू शकते.

T20 World Cup 2024 Team India Playing XI
Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणार पंत? रोहितने स्पष्ट केली संघाची रणनीती; म्हणाला...

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.