Chris Jordan Hat Trick: नेत्रावळकरचा त्रिफळा उडवत जॉर्डनची हॅट्ट्रिक

Chris Jordan: बार्बाडोस येथे जन्मलेला जॉर्डन गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो. आज त्याने आपल्या जन्म ठिकाणीच हॅट्ट्रिक घेण्याचा कारणामा केला आहे.
Chris Jordan Hat Trick
Chris Jordan Hat TrickEsakal
Updated on

टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 च्या अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकर याचा त्रिफळा उडवत हॅट्ट्रीक पूर्ण केली. ही यंदाच्या विश्वचषकातील तिसरी हॅट्ट्रीक आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने याच विश्वचषकात दोन वेळा अशी कामगिरी केली आहे.

बार्बाडोस येथे जन्मलेला जॉर्डन गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून खेळतो. आज त्याने आपल्या जन्म ठिकाणीच हॅट्ट्रिक घेण्याचा कारणामा केला आहे.

Chris Jordan Hat Trick
AUS vs AFG सामन्यात गरमा गरमी! स्टॉयनिसच्या सेंडऑफला गुरबाजचं चोख प्रत्युत्तर, ICC ने शेअर केला Video

यावेळी जॉर्डनने हॅट्ट्रिकसह एका षटकात चार विकेट्स घेतल्या आणि अमेरिकेचा डाव 115 धावांवर आटोपला. त्याने 2.5 षटकात 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.

या विश्वचषक स्पर्धेतील ही तिसरी हॅट्ट्रिक आहे. जॉर्डनच्या आधी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू पॅट कमिन्सने बांगलादेश आणि नंतर अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.

अली खान, नॉथुश केंजिगे आणि सौरभ नेत्रावळकर हे जॉर्डनच्या हॅट्ट्रिकचे बळी ठरले. दरम्यान या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉर्डनने कोरी अँडरसनचीही विकेट घेतली होती.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही आता नववी हॅट्ट्रिक आहे. स्पर्धेच्या इतिहासात हा पराक्रम नोंदवणारा जॉर्डन हा पहिला इंग्लिश खेळाडू ठरला आहे.

Chris Jordan Hat Trick
Sunil Gavaskar : रोहित लाडका तर विराट.... गावसकरांवर नेटकरी एवढे का भडकले?

टी 20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज

जोश लिटल (आयर्लंड) - 2022 वि न्यूझीलंड

कार्तिक मयप्पन (यूएई) - 2022 विरुद्ध श्रीलंका

कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) - 2021 विरुद्ध इंग्लंड

वानिंदू हसरंगा (श्रीलंका) - 2021 वि दक्षिण आफ्रिका

कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) - 2021 वि नेदरलँड्स

ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) - 2007 विरुद्ध बांगलादेश

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - 2024 विरुद्ध बांगलादेश

पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - 2024 विरुद्ध अफगाणिस्तान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.