T20 World Cup Video : टी-20 वर्ल्ड कपमध्ये युगांडाने रचला इतिहास! मॅच जिंकल्यानंतर 'त्या' अनोखा डान्सची सर्वत्र चर्चा

T20 World Cup 2024 Uganda vs Papua New Guinea
T20 World Cup 2024 Uganda vs Papua New Guineasakal
Updated on

T20 World Cup 2024 Uganda vs Papua New Guinea : टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील पहिला विजय नोंदवल्यानंतर युगांडाने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.

युगांडाने पापुआ न्यू गिनीविरुद्ध शानदार विजय मिळवला आणि त्यानंतर सर्व खेळाडूंनी त्यांचे पारंपारिक डान्स करून तो विशेष पद्धतीने साजरा केला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

T20 World Cup 2024 Uganda vs Papua New Guinea
T20 WC 2024 : टूर्नामेंटमध्ये कांगारू संघाची धमाकेदार सुरूवात! पहिल्या सामन्यात 'या' संघाला लोळवलं

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये नववा सामना पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात क गटात खेळला गेला. या सामन्यात युगांडाने पापुआ न्यू गिनीचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पापुआ न्यू गिनीचा संघ 19.1 षटकात केवळ 77 धावा करत गडगडला. प्रत्युत्तरात युगांडाने 18.2 षटकांत 7 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात युगांडाचा हा पहिला विजय आहे. या विजयाने संघातील खेळाडू खूप आनंदी दिसले आणि त्यांनी आपल्या पारंपरिक शैलीत नृत्य करून आनंद साजरा केला.

या सामन्यात युगांडाकडून फ्रँक सुबुगाने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 4 धावा देत 2 बळी घेतले. यादरम्यान त्याने दोन मेडन षटके टाकली. पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील 4 षटकांचा हा सर्वात किफायतशीर स्पेल आहे आणि फ्रँक सुबुगाने ऐतिहासिक विक्रम रचला.

याशिवाय फ्रँक सुबुगा हा पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या 43 वर्षे 282 दिवसांत टी-20 वर्ल्ड कप खेळला. यापूर्वी हा विक्रम रायन कॅम्पबेलच्या नावावर होता. त्याने 2016 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वयाच्या 44 वर्षे 316 दिवसांत वर्ल्ड कप खेळण्याचा विक्रम केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.