T20 World Cup: ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या तोडफोड सिक्स, स्टेडियमचं झालं मोठं नुकसान; ICC ने शेअर केला Video

Australia vs England: इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधाराने एक जोरदार षटकार खेचला, ज्यामुळे स्टेडियमचे मोठे नुकसान झाले आहे.
Mitchell Marsh
Mitchell MarshSakal
Updated on

Mitchell Marsh Six: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बलाढ्य संघात सामना झाला. बार्बाडोसला झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी विजय मिळवला.

याच सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने छोटेखानी पण आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने मारलेल्या एका शॉटने स्टेडियममधील एका सोलर पॅनलचं नुकसानही झालं आहे.

झाले असे की या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीसाठी उतरले. यावेळी ऑस्ट्रेलियाला ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीला आक्रमक खेळताना चांगली सुरुवात दिली. पण 5 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वॉर्नर 39 धावा करून बाद झाला.

त्यानंतर मार्श फलंदाजीला उतरला होता. त्याने सध्या टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला गोलंदाज आदिल राशिद गोलंदाजी करत असलेल्या 9 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला.

Mitchell Marsh
T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'या' देशाचा लाजिरवाणा पराक्रम! वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 39 धावांवर खेळ खल्लास अन्...

राशिदने टाकलेल्या अखुड टप्प्याच्या चेंडूवर मार्शने जोरादार शॉट मारला, त्यामुळे चेंडू ग्रिनिज-हायन्स स्टँडच्या छपरावर गेला. यावेळी तिथे बसवण्यात आलेले सोलर पॅनलने मोठे नुकसान झाले. याचा व्हिडिओही आयसीसीने शेअर केला आहे. दरम्यान, मार्श नंतर 14 व्या षटकात 25 चेंडूत 35 धावा करून बाद झाला.

दरम्यान, स्टेडियमवरील सोलर पॅनल तुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर स्कॉटलंडच्या मायकल जोन्सने षटकार ठोकला होता, ज्यामुळे सोलर पॅनलचे नुकसान झाले होते.

Mitchell Marsh
T20 World Cup 2024 : इंग्लंड संघाला मोठा धक्का! 'ग्रुप B'चे गणित झाले मनोरंजक.... स्कॉटलंडला अव्वल स्थान कायम ठेवण्याची संधी

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 201 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला 20 षटकात 6 बाज 165 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जॉस बटलरने 42 धावा केल्या, तर फिलिप सॉल्टने 37 धावांची खेळी केली. मात्र अन्य कोणाला खास काही करता आले नाही.

गोलंदाजीत इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोईन अली, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तसेच ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेजलवूड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com