T20 World Cup 2024 West Indies defeat USA : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजने अमेरिकेचा पराभव करून इंग्लंड संघाची डोकेदुखी वाढली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या 46 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने अमेरिकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 19.5 षटकांत केवळ 128 धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघाने हे लक्ष्य 10.5 षटकांत केवळ एक गडी गमावून पूर्ण केले.
या सामन्यातील पराभवामुळे अमेरिकेचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजने दणदणीत विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता गटातून उपांत्य फेरीच्या लढतीत फक्त दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे संघ उरले आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. यूएसएची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 3 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. यानंतर आंद्रेस गॉस आणि नितीश कुमार यांनी काही काळ डाव सांभाळला पण ते बाद होताच संपूर्ण संघ कोलमडूला आणि संघ 19.5 षटकांत 128 धावांवरच मर्यादित राहिला. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल आणि रोस्टन चेस यांनी ३-३ बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना शाई होप आणि जॉन्सन चार्ल्स या सलामीच्या जोडीने विंडीजला झंझावाती सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 7 षटकांत 67 धावा केल्या. या काळात जॉन्सन चार्ल्सला केवळ 15 धावा करता आल्या पण शाई होपने अतिशय तुफानी खेळी खेळली. त्याने 39 चेंडूत 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या.
यूएसएचा आतापर्यंतचा प्रवास
यजमान यूएसए संघ प्रथमच टी-20 वर्ल्ड कप खेळला आहे. संघाने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली. पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या संघाने पहिल्याच सामन्यात कॅनडाचा 7 गडी राखून पराभव केले. मग सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून अमेरिकेने या स्पर्धेतील सर्वात मोठा अपसेट केला. यानंतर अमेरिकेने भारत आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांना खडतर आव्हान दिले. या दोन संघांविरुद्धही अमेरिकेने सहजासहजी हार मानली नाही. मात्र, सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध अमेरिकेची कामगिरी खराब झाली.
- कॅनडाविरुद्ध 7 विकेट्सने विजय
- सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव
- भारताकडून 7 गडी राखून पराभव
- आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द
- दक्षिण आफ्रिकेकडून 18 धावांनी पराभव
- वेस्ट इंडिजकडून 9 गडी राखून पराभव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.