T20 World Cup: विंडिजची विजयी सलामी! PNG ने फोडलेला घाम, पण अखेरीस रोस्टनच्या आक्रमणामुळे यजमानांनी केलं टार्गेट 'चेस'

West Indies vs Papua New Guinea: वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पीएनजीला पराभूत करत विजयी सुरुवात केली आहे.
West Indies
West IndiesSakal
Updated on

T20 World Cup 2024, WI vs PNG: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत रविवारी (2 जून) दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यु गिनी (PNG) संघात झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 5 विकेट्सने विजय मिळवला. यासह वेस्ट इंडिजने या स्पर्धेच्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली.

या सामन्यात पीएनजीने वेस्ट इंडिजसमोर 137 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग वेस्ट इंडिजने 19 षटकात 5 विकेट्स गमावत पूर्ण केला. 137 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडिजसाठी सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी दुसऱ्याच षटकात सलामीवीर जोन्सन चार्ल्सची शुन्यावर विकेट गमावली.

त्यानंतरही विंडिजच्या खेळाडूंना मोठे फटके मारताना अडचणी येत असल्याचे दिसले. तरी पहिल्या विकेटनंतर ब्रेंडन किंग आणि निकोलस पूरन यांनी संयमी खेळ करत अर्धशतकी भागीदारी केली होती. अखेर ही भागीदारी जॉन कारिकोने तोडली. त्याने पूरनला 27 धावांवर बाद केले.

West Indies
T20 World Cup: वर्ल्ड कप मोहिम सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला टेन्शन, द्रविडने व्यक्त केली दुखापतीची भीती

यानंतर ब्रेंडन किंगला कर्णधार असाद वालाने 34 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल (15) आणि शेरफेन रुदरफोर्ड (2) झटपट बाद झाल्याने वेस्ट इंडिज दबावात आले होते.

परंतु अखेरीस रोस्टन चेसने आंद्रे रसेलला साथीला घेत आक्रमक खेळ केला. त्यामुळे वेस्ट इंडिजने 19 व्या षटकात विजय निश्चित केला. चेस 27 चेंडूत 42 धावा करून नाबाज राहिला, तर रसेल 9 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला.

पीएनजीकडून गोलंदाजीत असाद वालाने 2 विकेट्स घेतल्या, तर अलेई नाओ, छाड सोपर आणि जॉन कारिको यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

West Indies
T20 World Cup : अमेरिकेतील वातावरण क्रिकेटमय; बास्केटबॉल, बेसबॉलच्या देशात क्रिकेटचा बोलबाला

तत्पुर्वी या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजला पहिले यश रोमरिओ शेफर्डने मिळवून दिले. त्याने सलामीवीर टोनी उराला 2 धावांवरच माघारी धाडले.

त्यानंतर मात्र पीएनजीने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. तरी एका बाजूने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सेसे बाऊने झुंज दिली. त्याने 43 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. त्याला कर्णधार असाद वाला (21) आणि चार्ल्स अमिनीने (12) साथ देण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस यष्टीरक्षक फलंजदाज किप्लिना डोरिगाने 18 चेंडूत नाबाद 27 धावा ठोकल्या. त्यामुळे पीएनजीला 20 षटकात 8 बाद 136 धावा करता आल्या आणि वेस्ट इंडिजसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवता आले.

वेस्ट इंडिजकडून रसेल व्यतिरिक्त अल्झारी जोसेफनेही 2 विकेट्स घेतल्या. अकील हुसेन, रोमरिओ शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.