IND vs PAK : भारत - पाक सामना न्यूयॉर्कमधून हलवण्यात येणार; काय म्हणातंय आयसीसी?

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कचा नासाऊ काऊन्टी क्रिकेट स्टेडियममधील खेळपट्ट्यांबाबत वाद निर्माण झाला आहे.
IND vs PAK
T20 World Cup 2024 esakal
Updated on

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमधील ड्रॉप इन पिचेसबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ स्टेडियममधील या खेळपट्ट्यांवर लो स्कोअरिंग सामने होत आहेत. त्यामुळे इथले सामने दुसरीकडे हलवण्यात यावे अशी जोरदार मागणी होत आहे. नासाऊमधील खेळपट्टी ही गोलंदाजांना फारच पोषक आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा डाव 77 धावाज गुंडाळला होता. त्यानंतर भारताने आयर्लंडचा डाव 96 धावात संपवला.

बीसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 'भारतीय संघाने खासगीत खेळपट्ट्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. खेळपट्टीवर चेंडू असमान उसळी घेतोय. त्यामुळे फलंदाजांना दुखापत होण्याचा धोका असल्याचं भारतीय संघाचं म्हणणं आहे.'

IND vs PAK
David Warner Video : डेव्हिड वॉर्नर 51 चेंडूत 56 धावा करून बाद झाला अन् पॅव्हेलियनचा रस्ताच विसरला

'भारतीय संघ आता रविवारी पाकिस्तानसोबत याच मैदानावर खेळणार आहे. आयसीसी रद्द झालेल्या सामन्याबाबत माहिती घेत आहे. त्यानंतर त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे ठरवण्यात येईल. आयसीसी अधिकाऱ्यांनी सध्या तरी न्यूयॉर्कमधून दुसरीकडे सामने हलवण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली नाही असं सांगितले. न्यूयॉर्कमधील सामना फ्लोरिडा किंवा टेक्सास येथे हलवण्यात येणार अशी चर्चा सरू होती.'

बीसीसीच्या वृत्तानुसार, भारत - पाकिस्तान सामन्यासाठी फ्रेश खेळपट्टी असणार आहे. याचबरोबर इतर खेळपट्ट्या कशा आहेत त्यावर सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

IND vs PAK
Ind vs Pak T20 World Cup: भारत-पाकिस्तान मॅच पार्किंगचे तिकीट दर माहितीयेत का? डोक्याला हात लावून म्हणाल, उगीच घेतली गाडी...

न्यूयॉर्कमध्ये टी 20 वर्ल्डकपसाठी अस्थायी स्टेडियम तयार करण्यात आले होते. त्यासाठी ऑस्ट्रेलियामधून खेळपट्ट्या आणण्यात आल्या होत्या. काही आठवड्यापूर्वी ड्रॉप इन पिचेस बसवण्यात आल्या होत्या.

या खेळपट्ट्या फलंदाजीला पोषक असतील असा अंदाज क्युरेटरने वर्तवला होता. मात्र त्याच्या उलट खेळपट्ट्या गोलंदाजीला जास्त पोषक ठरत असल्याने संघांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.