T20 World Cup 2024: फिल्डिंगसाठी उतरले कोच आणि सिलेक्टर, वर्ल्डकप सामन्यात टीम ऑस्ट्रेलियावर का आली अशी वेळ?

Australia Coach and Selector fielded for Team in Warm UP: टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियासमोर एक नवी समस्या उभी राहिली आहे.
Australia Coach and Selector fielded for Team in Warm UP
Australia Coach and Selector fielded for Team in Warm UPsakal
Updated on

Australia T20 World Cup warm-up match: टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियासमोर एक नवी समस्या उभी राहिली आहे. आयपीएल 2024 मुळे त्यांना सराव सामन्यासाठी पूर्ण 11 खेळाडू मिळाले नाहीत. याच कारणामुळे कांगारू संघाच्या वतीने सहाय्यक प्रशिक्षक आंद्रे बोरोवेक आणि राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली यांना मैदानात उतरावे लागले. मात्र, असे असतानाही संघाने हा सामना अगदी सहज जिंकला.

Australia Coach and Selector fielded for Team in Warm UP
Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट; ICCच्या 'या' नियमाने वाढवली सर्वांची चिंता

खरंतर, ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज खेळाडू आयपीएल 2024 मध्ये सहभागी झाले होते. यातील काही खेळाडूंच्या संघांनी प्लेऑफ आणि फायनलपर्यंतचा प्रवास केला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे तीन मोठे आणि प्रमुख खेळाडू आयपीएल 2024 चा अंतिम सामना खेळत होते. पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड सनरायझर्स हैदराबाद संघात होते, तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क केकेआर संघाचा भाग होता.

मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात आहेत. कॅमेरून ग्रीन अद्याप वेस्ट इंडिजला पोहोचलेला नाही. याच कारणामुळे सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे खेळाडूंची कमतरता होती.

Australia Coach and Selector fielded for Team in Warm UP
T20 World Cup 2024 : तुफान वादळात स्टेडियमची तुटली स्क्रीन; T20 वर्ल्ड कपपूर्वी 'या' संघांचे सामने रद्द

या कारणास्तव, ऑस्ट्रेलियाला 11 खेळाडू पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षक आणि निवडकर्त्याची निवड करावी लागली. सहाय्यक प्रशिक्षक आंद्रे बोरोवेक आणि राष्ट्रीय निवडकर्ता जॉर्ज बेली संघाच्या वतीने मैदानात उतरले. दोघेही स्क्वेअर लेग आणि फायनल लेगच्या दिशेने उभे असलेले दिसले. याशिवाय मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डही काही काळ मैदानात उतरले.

पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात सराव सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नामिबियाचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाच्या संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 119 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने अवघ्या 10 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

Australia Coach and Selector fielded for Team in Warm UP
T20 World Cup : विजेतेपदासाठी भारत प्रमुख दावेदार; मॉर्गन

ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 25 धावा देऊन 3 बळी घेतले. याशिवाय अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 4 षटकात केवळ 5 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरने अवघ्या 21 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.