Chris Gayle: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी सामना होत आहे. न्यूयॉर्कमधील नसाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे.
भारत आणि पाकिस्तान हा सामना म्हटलं की फक्त चाहत्यांमध्येच नाही, तर आजी-माजी क्रिकेटपटूंमध्येही याची चर्चा आणि उत्साह असतो. असाच उत्साह वेस्ट इंडिजचा माजी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलमध्येही दिसला आहे.
युनिवर्स बॉस म्हणून ओळखला जाणारा गेल या सामन्यासाठी एक खास जॅकेट घालून आला होता. त्याच्या पांढऱ्या रंगाच्या जॅकेटच्या एका हाताच्या बाजूला भारताच्या झेंड्यातील केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगाच्या छटा होत्या आणि दुसऱ्या हाताच्या बाजूला पाकिस्तानच्या झेंड्यातील हिरव्या रंगाची छटा होती.
गेल या सामन्यातील नाणेफेक होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या आजी-माजी खेळाडूंना भेटताना दिसला. इतकेच नाही, तर तो त्याच्या जॅकेटवर या खेळाडूंच्या स्वाक्षरी घेतानाही दिसला.
यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा, बाबर आझम त्याच्याबरोबर मस्ती करताना दिसले. या क्षणांचा व्हिडिओही आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला युजर्सकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सही येत आहेत.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेलची आयसीसीने यंदाच्या टी२० वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे. त्याच्यासह भारताचा युवराज सिंग, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आणि वेगाचा बादशाह उसेन बोल्ट हे देखील या टी२० वर्ल्ड कपचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही, पण पाकिस्तानने आझम खानच्या जागेवर इमाद वसीमला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
असे आहेत दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन -
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
पाकिस्तान - मुहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रीदी, हरीस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.