T20 WC : Powerplay मध्ये टीम इंडियाचं दमदार मायलेज

अपयश भरुन काढण्यासाठी दमदार फटकेबाजी
India vs Afghanistan
India vs Afghanistan Twitter
Updated on

T20 World Cup India vs Afghanistan : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या दोन लढतीनंतर अखेर टीम इंडियाची गाडी रुळावर आलीये. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ पहिल्या दोन सामन्यात चांगलाच संघर्ष करतान दिसला. पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा या जोडीनंच संघाच्या डावाला सुरुवात केली. पण त्यांना नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले होते. दोघेही स्वस्तात माघारी फिरल्यानंतर भारतीय संघाने पावर प्लेमध्ये 3 बाद 36 धावा केल्या होत्या.

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले. या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला संधी मिळाली. त्यानेच लोकेश राहुलच्या साथीने डावाला सुरुवात केली. पण हा प्रयोगही फसला. इशान किशन आणि के राहुल यांची विकेट गमावून या सामन्यात टीम इंडियाने पावर प्लेमध्ये 35 धावा केल्या होत्या.

India vs Afghanistan
NZ vs SCO : टीम इंडियाला जे जमलं नाही ते स्कॉटलंडनही करुन दाखवलं!

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात सलामी जोडी पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये दिसली. दोघांनी पावर प्लेमध्ये 53 धावा केल्या. यंदाच्या स्पर्धेत पावर प्लेमधील ही पाचव्या क्रमांकाची धावसंख्या आहे. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या 6 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा इंग्लंडच्या नावे आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बिनबाद 66 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध दुबईच्या मैदानात बिन बाद 63 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानने स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात शारजाच्या मैदानात 1 बाद 55 धावा करुन दाखवल्या होत्या. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील शारजाच्या लढतीत श्रीलंकेनं 1 बाद 54 धावा केल्या होत्या. या यादीत आता टीम इंडियाचाही समावेश झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.