पोलार्ड धाव पूर्ण करुन नॉन स्टॉप 'डग आउट'मध्ये पोहचला...

स्नायू दुखापतीमुळे मेडिकल मदत घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे नंतर समोर आले.
kieron pollard
kieron pollard Sakal
Updated on

T20 World Cup : बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यात एक अजब-गजब घटना पाहायला मिळाली. केरॉन पोलार्ड धाव पूर्ण करुन तो मैदानाबाहेर गेला. धाव घेता घेता पोलार्ड थेट 'डग आउट'मध्ये पोहचल्यामुळे नेमकं काय सुरु आहे हे कुणालाच काही कळलं नाही. ही गोष्ट सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातील 13 व्या षटकात हा सर्व प्रकार घडला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पोलार्डने एका धावेसाठी चेंडू फटकावला. धाव पूर्ण केल्यानंतर तो नॉन स्टॉप डग आउटमध्ये पोहचला. स्नायू दुखापतीमुळे मेडिकल मदत घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे नंतर समोर आले. एवढेच नाही तर पोलार्ड पुन्हा खेळायलाही आला. ज्यावेळी पोलार्ड मैदान सोडून गेला त्यावेळी त्याने 16 चेंडूत 8 धावा केल्या होत्या.

kieron pollard
रोहितऐवजी इशान-राहुलने ओपनिंग करावी? माजी क्रिकेटर म्हणतो...

काही विकेट पडल्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला. अखेरच्या षटकात मुस्तफिझुरने पहिल्या चेंडूवर ड्वेन ब्रावोला बाद केले. त्यानंतर पोलार्ड खेळायला आला. उर्वरित पाच चेंडूत जेसन होल्डरने दोन षटकार लगावल्यानंतर अखेरच्या चेंडूवर पोलार्डने खेचलेल्या षटकाराच्या जोरावर वेस्ट इंडीदने 142 धावांपर्यंत मजल मारली.

kieron pollard
डेव्हिड वॉर्नरने मोडला शेन वॉटसनचा विक्रम

पहिल्यांदा बॅटिंग करताना ख्रिस गेल आणि एविन लुईसनं संघाच्या डावाला सुरुवात केली. पण या जोडीला दमदार सुरुवात करता आली नाही. धावफलकावर अवघ्या 12 धावा असताना लुईसच्या रुपात वेस्ट इंडीजला पहिला धक्का बसला. रोस्टन चेसने 46 चेंडूत 39 आणि पूरनने 22 चेंडूत 40 धावांची खेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()