IND vs PAK : आफ्रिदीच्या जावायानं मोडला टीम इंडियाचा कणा!

हुकमी फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडल्यामुळे सोशल मीडियावर शाहीन आफ्रिदी ट्रेंडमध्ये आला आहे.
IND vs PAK
IND vs PAKSakal
Updated on

You Know Pakistan cricketer Shaheen Afridi : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानच्या डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाने भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. शाहीन आफ्रिदीने सलामीची जोडी स्वस्तात माघारी धाडली. एवढेच नाही तर त्याने अर्धशतकी खेळी करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचीही विकेट घेतली. भेदक माऱ्याने टीम इंडियाच्या हुकमी फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडल्यामुळे सोशल मीडियावर शाहीन आफ्रिदी ट्रेंडमध्ये आला आहे. गूगलवर शाहीन आफ्रिदी आणि पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांच्यातील नाते काय? असा शोधही नेटकरी घेत आहेत.

2018 मध्ये शाहीन आफ्रिदीनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या जलदगती गोलंदाजीने त्याने अल्पावधीत पाकिस्तानचा प्रमुख जलदगती गोलंदाज अशी ओळख निर्माण केली. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी तो विवाह करणार आहे. खुद्द शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात यासंदर्भात पृष्टी दिली होती. मोठी मुलगी अक्सा (Aqsa Afridi) सोबत शाहीन आफ्रिदी विवाह करणार आहे, असे शाहिद आफ्रिदीने सांगितले होते. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन (Shaheen Shah Afridi) आणि भविष्यात जावाई होणार असल्याचे त्याने म्हटले होते.

IND vs PAK
IND vs PAK: 'कॅप्टन कोहली'ची झुंजार खेळी; रचला विश्वविक्रम!

जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने आफ्रिदी नावाच्या 8 वेगवेगळ्या जमाती असल्याचे सांगत शाहीन आफ्रिदी आणि स्वत: वेगवेगळ्या जमातीत येतो. त्यामुळे तो माझा जावाई होऊ शकतो, असे म्हटले होते. शाहिद आफ्रिदीची मुलकी अक्सा डॉक्टर होण्याची मनिषा बाळगून आहे. ती आपले शिक्षण पाकिस्तानमध्ये करणार की इंग्लंडमध्ये यासंदर्भातही चर्चा रंगली होती. शाहीन आफ्रिदीचे वडील अयाज खान यांनी पाकिस्तान प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहीन आणि अक्सा यांच्यातील विवाहासंबंधात सकारात्मक बोलणी झाल्याचे सांगितले होते.

IND vs PAK
INDvsPAK: शाहिन आफ्रिदी चमकला; रोहित, राहुल, विराटला केलं बाद

शाहीन आफ्रिदीनं 4 षटकात 31 धावा खर्च करुन तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. यात सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांचा समावेश आहे. ही मंडळी एकहाती मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असणारी आहेत. त्याने टीम इंडियाचा कणाच मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.