Team India: मुंबईच्या 4 खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आज सत्कार; 1 कोटींचे बक्षीस देऊन होणार गौरव

4 Mumbai players felicitated in Maharashtra legislature: महाराष्ट्र सरकारडून चार खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये गौरव करण्यात येईल. शुक्रवारी टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती.
Team India
Team India

मुंबई- टीम इंडियाच्या मुंबईतील चार खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्य कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार सरकार करणार आहे. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये गौरव करण्यात येईल.

शुक्रवारी टीम इंडियाची विजयी मिरवणूक मुंबईत काढण्यात आली होती. आपल्या विजयी टीमला पाहण्यासाठी मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर चाहत्यांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली होती. नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची मिरवणूक काढण्यात आली होती. वानखेडे स्टेडियमवर ग्रँड सेलिब्रेशन झाले. यावेळी बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचा चेक बक्षीस म्हणून देण्यात आला आहे.

Team India
Team India Parade: हा तर शुद्ध वेडेपणा! दुसरे हाथरस घडले असते; टीम इंडियाच्या मिरवणुकीवर सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आणि ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या चार दिवसांपासून भारतीय चाहते आपल्या आवडत्या टीमची वाट पाहत होते. मात्र, बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया काही दिवस तिथे अडकली होती. अखेर गुरुवारी सकाळी टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले आणि चाहत्यांच्या जल्लोषाला सुरुवात झाली.

Team India
Shah Rukh Khan: अरे हे किती भारी आहे... मरीनवरील परेड पाहून किंग खान भारावला; टीम इंडियासाठी केलेली पोस्ट चर्चेत

विधिमंडळात मुंबईतील खेळाडूंचा सत्कार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतल्या चार खेडाळूंचा आज चार वाजता सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com