Team India Arrival : चाहत्यांच्या जनसागरात हरवली टीम इंडिया! दिवसाची सुरूवात रोहितनं तर शेवट केला हार्दिकनं

Team India Arrival : टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघ बार्बाडोसहून मायदेशात पोहोचला.
Rohit Sharma Team India
Team India Arrival ESAKAL

T20 world Champion Team India Arrives Home :

भारतीय संघासाठी 4 जुलै हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला. दिल्लीच्या विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत संपूर्ण देश हा टीम इंडियामय झाला होता. ढोल ताशाच्या गजरात सेलिब्रेशन करताना ना टीमचा ना चाहत्यांचा उत्साह कमी झाला. त्यात वरूण राजाची उपस्थिती चार चांद लावून गेली. यावेळी एक घटना अनेक काही गोष्टी सांगून गेली. ज्यावेळी टीम इंडिया भारतात आली त्यावेळी ट्रॉफी रोहितकडं होती. मात्र टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये पोहचेपर्यंत हीच ट्रॉफी भावी कर्णधार रोहित शर्माकडं आली.

अभूतपूर्व कामगिरी करून टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला आहे. संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

त्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली. हवामान खराब असल्यानं टीम इंडिया मुंबईत उशीराने दाखल झाली. विमान तळावरून टीम इंडिया बसमधून रवाना झाली. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची प्रचंड गर्दी आहे. अनेक चाहते रोहित शर्मासाठी तुफान पावसात देखील रस्त्यावर उतरले आहे.

अखेर उशीरा का होईना टीम इंडिया मिरवणुकीच्या बसवर सवार झाली. मात्र चाहत्यांच्या प्रचंड जनसागराच्या उपस्थितीमुळे टीम बसची गती फारच कमी होती. टीमचा उत्साह मात्र प्रचंड होता. संघातील खेळाडू वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावत, हातवारे करत चाहत्यांचे अभिवादन स्विकारत होते.

ढोल ताशाच्या तालावर टीम इंडियातील खेळाडू ओपन बसमध्येच नृत्य करू लागले होते. याच मोठ्या उत्साहात टीम इंडिया वानखेडेवर पोहचली.

Team India Arrival : रोहित शर्माने चाहत्यांचे मानले आभार 

रोहित शर्मा वानखेडेवर म्हणाला की, आम्ही भारतात आल्यापासून जे आमचं स्वागत झालं आहे ते पाहून आमच्यापेक्षा देशातील जनतेलाचीच ट्रॉफी जिंकण्याची किती तीव्र इच्छा होती हे दिसून येतं.

वानखेडेवर हार्दिक पांड्याच्या नावाचा जय जयकार

ज्या वानखेडे स्टेडियमवर अवघ्या काही महिन्यापूर्वी हार्दिक पांड्याविरूद्ध हुटिंग झालं त्याच पांड्याला आज क्रिकेट चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.

Team India Arrival Live Updates : रोहित शर्मा बालेकिल्ल्यात पोहचला; वानखेडेवर टी 20 वर्ल्डकपची ट्रॉफी

रोहित शर्मा आणि टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहचला आहे. संघाने स्टेडियमवर ढोल ताशाच्या गजरात नृत्य करत सेलिब्रेशन सुरू केलं आहे.

Team India Arrival Live Updates : मरीन ड्राईव्हवर लोटला जनसागर; टीम इंडियाची बस थोड्याच वेळात पोहचणार वानखेडेवर

टीम इंडियाची विजयी मिरवणूक ही मुंगीच्या गतीनं पुढं सरकत आहे. मरीन ड्राईव्हर जनसागर लोटला असून त्यातून टीमची बस अत्यंत संथ गतीनं पुढं जात आहे.

Team India Arrival Live Updates : टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरूवात

टीम इंडियाच्या विजयाची मिरवणूक सुरू झाली आहे. भारतीय संघ विजय रथ या ओपन टॉप बसमधून वानखेडेच्या दिशेने कूच करत आहे.

T20 World Cup champions live : टीम इंडियाची 'विजय रथ' बस गर्दीत अडकली

मुंबई : टी-20 वर्ल्डकप चॅम्पियनला घेऊन जाणाऱ्या टीम इंडियाची 'विजय रथ' बस गर्दीत अडकली. पोलिस कर्मचारी जमाव पांगवतात आणि बसला मरीन ड्राईव्हकडे जाण्यासाठी रस्ता तयार करतात.

Team India Arrival Live Updates : टीम इंडियाची बस विमानतळावरून पडली बाहेर; थोड्याच वेळात पोहचणार मरीन ड्राईव्हवर

टीम इंडिया मरीन ड्राईव्हच्या दिशेने कूच केली आहे. मुंबई विमानतळावरून बस रवाना झाली आहे.

Team India Arrival Live Updates : भारतीय संघ मुंबई विमानतळातून पडला बाहेर 

टीम इंडिया मुंबईच्या विमानतळावर दाखल झाली आहे. थोड्याच वेळात संघ विमानतळाच्या बाहेर पडणार आहे.

Team India Arrival Live Updates : मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर येऊ नका... मुंबई पोलिसांची चाहत्यांना कळकळीची विनंती

मुंबई पोलिसांनी क्रिकेट चाहत्यांना एक कळकळीची विनंती केली आहे. मुंबई पोलिसांनी मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमकडे येऊ नका अशी विनंती केली आहे. आधीच इथं जवळपास 4 लाख लोकं जमा झाली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे आवाहन करण्यात आलं आहे.

Team India Arrival Live Updates : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावर टीम इंडियाला देण्यात आली सलामी

मुंबई विमानतळावर टीम इंडियाच्या विमानाला सलामी देण्यात आली. यावेळी पाण्याच्या फवाऱ्यांनी टीम इंडियाच्या विमानाला सलामी दिली.

Team India Arrival Live Updates : टीम इंडिया मुंबईत दाखल; मरीन ड्राईव्हवर प्रचंड गर्दी, मिरवणुकीला होणार उशीर?

टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. मात्र मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. सामने दिलेल्या वृत्तानुसार मरीन ड्राईव्हवर जवळपास 3 लाख लोक जमा झाले आहेत. त्यामुळे मिरवणूक मार्गात बदल किंवा मिरवणुकीस उशीर होऊ शकतो.

Team India Arrival Live Updates : टीम इंडिया मुंबईत दाखल; काहीच वेळात निघणार विजयी मिरवणूक

दिल्लीवरून निघालेलं टीम इंडियाचं विमान हे मुंबई विमानतळावर उतरलं असून काही वेळातच टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार आहे.

Team India Arrival Live Updates : टीम इंडिया काही मिनिटातच मुंबई विमानतळावर होणार दाखल

भारतीय संघ दिल्लीवरून रवाना झाला असून 5 वाजून 19 मिनिटांनी टीम इंडियाचं विमान मुंबई विमानतळावर लँड करणार आहे. पावसामुळे टीम इंडियाच्या आगमनाला विलंब झाला.

Team India Arrival Live Updates : खराब हवामानामुळं टीम इंडियाचं मुंबईतील आगमन लांबणार

हवामान खराब असल्याने भारतीय क्रिकेट संघाचे विमान हे साधारणपण ४० ते ४५ मिनिटांनी मुंबईत land होईल.त्यामुळे 4 वाजता मुंबई विमानतळावर पोचणाऱ्या भारतीय संघाला मुंबईत पोहोचण्यासाठी साधारणपणे पावणे पाच वाजतील असा अंदाज आहे.

Team India Arrival Live Updates : मुंबईत जोरदार पाऊस; टीम इंडियाच्या सेलिब्रेशनला वरूण राजानेही लावली उपस्थितीत

टीम इंडिया मुंबईत पोहचण्यापूर्वीच वानखेडेवर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची तीव्रता अधिक असल्याने संघाची विजयी मिरवणूक कशी निघणार याबाबत चाहते चिंता व्यक्त करत आहेत. चाहत्यांचा उत्साह मात्र शिगेला पोहचला असून गर्दी तसुभर देखील कमी झालेली नाही.

Team India Arrival Live Updates : नरीमन पॉईंटवर वनडे वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या 

टीम इंडिया काही वेळातच मुंबईत दाखल होणार आहे. टीम इंडियाची नरीमन पॉईंटवरून वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी चाहते नरीमन पॉईंटवर पोहचत आहेत. काही चाहते 2011 वनडे वर्ल्डकपच्या आठवणींना उजाळा देण्याचा देखील प्रयत्न करत आहेत.

Team India Arrival Live Updates : वानखेडे स्टेडियमवर चेंगराचेंगरी; चाहत्यांचा अती उत्साहामुळे घडली घटना

टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा साक्षीदार होण्यासाठी एमसीएने चाहत्यांना वानखेडेवर मोफत प्रवेश दिला आहे. मात्र प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असल्याने स्टेडियममध्ये जागा मिळवण्यासाठी गर्दी झाली अन् चेंगराचेंगरीचे प्रकार देखील झाले.

 Team India Arrival Live Updates : टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे सज्ज

मुंबई क्रिकेट असोसिएशनने टीम इंडियाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. वानखेडेवर चाहत्यांना मोफत प्रवेश असल्यानं आतापासूनच स्टेडियमबाहेर चाहत्यांच्या लांबच लांब रांगा लागेल्या आहेत.

 Team India Arrival Live Updates : बीसीसीआयने पंतप्रधानांना दिली टीम इंडियाची जर्सी भेट 

बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली. या जर्सीवर नमो असं लिहिलं होतं अन् ही जर्सी एक क्रमांकाची होती.

Team India Arrival Live Updates : विराट कोहलीने PMनरेंद्र मोदींसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला अन्...

टी-20 वर्ल्ड कप 2024 ची ट्रॉफी जिंकून भारतीय संघाचे खेळाडू आज बार्बाडोसहून दिल्लीला पोहोचले, त्यानंतर संपूर्ण संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पंतप्रधानांसोबतच्या या खास भेटीचे काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले आहे की, आज आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. सर, आज आम्हाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद.

 Team India Arrival Live Updates : नव्या चॅम्पियन्सची मिरवणुकीसाठीची खास बस मरिन ड्राईव्हवर पोहचली. 

भारतीय विश्वविजेत्या संघाची ज्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे ती बस आता मरिन ड्राईव्हवर पोहचली आहे. टीम इंडिया काहीच वेळात दिल्लीतून रवाना होणार आहे. त्यानंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Team India Arrival Live Updates : टीम इंडियाचा PM मोदींसोबतच्या 'त्या' भेटीचा व्हिडिओ आला समोर, रोहित-कोहली अन्...

टीम इंडियाचा पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये वर्ल्ड चॅम्पियन टीम पंतप्रधानांसोबत विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहे.

Team India Arrival Live Updates : PM मोदींना मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया दिल्ली विमानतळाकडे रवाना

पीएम मोदींची भेट घेऊन टीम इंडिया रवाना झाली आहे.

Team India Arrival Live Updates : टीम इंडियाने PM मोदींना भेटण्यासाठी घातली खास जर्सी, केला 'हा' मोठा बदल

खरंतर, या जर्सीचा रंग पूर्वीसारखाच आहे. पण जर्सीच्या मध्यभागी चॅम्पियन्स असे लिहिलेले आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर आणखी एका स्टारची अॅड केला आहे.

Team India Arrival Live Updates : भारतीय संघ पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल! काही वेळात होणार विशेष भेट

भारतीय संघ पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आहे. जगज्जेते काही वेळाने पंतप्रधान मोदींना भेटतील.

Team India Arrival Live Updates : रोहित-विराटने कापला केक! PM मोदींच्या निवासस्थानी झाले रवाना

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आयटीसी मौर्या हॉटेलने तयार केलेला खास केक कापला. या सोहळ्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी रवाना झाली.

Team India Arrival Live Updates : आले रे आले... अजिंक्यवीर आले! थोड्याच वेळात रोहित अँड टीम PM मोदींच्या निवासस्थानी होणार रवाना

भारतीय संघ आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचला आहे. येथे खेळाडू आता काही काळ विश्रांती घेतील. त्यानंतर पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी रवाना होणार आहे.

Team India Arrival Live Updates : कोहलीचे कुटुंबीयही पोहोचले हॉटेलमध्ये

विराट कोहलीचे कुटुंबीय त्याच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

Team India Arrival Live Updates schedule : टीम इंडियाच्या शेड्यूलमध्ये थोडा ट्विस्ट; PM मोदींना भेटण्याचे ठिकाण बदलले

भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. त्यासाठीचा कालावधी सकाळी ९:३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. मात्र, ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानाऐवजी पंतप्रधानांच्या कार्यालयात होणार आहे.

Team India Arrival Live Updates : आले रे आले... अजिंक्यवीर आले! रोहित-पांड्याही पोहोचले हॉटेलमध्ये आता थेट...

कर्णधार रोहित शर्मा, कोहली आणि हार्दिक पांड्याही हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

Team India Arrival Live Updates :  फक्त १ कि.मी. अंतराची विजय यात्रा

खेळाडूही थकलेले असल्यामुळे आणि प्रवासाचाही क्षीण असल्यामुळे ही विजय यात्रा केवळ एक कि.मी. अंतराची असणार आहे. एनसीपीए ते वानखेडे असा मार्ग असेल. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये खेळाडूंचा सत्कार समारंभ होणार आहे आणि तेव्हाच संपूर्ण संघासाठी जाहीर करण्यात आलेले १२५ कोटी रुपयांचे बक्षीसही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Team India Arrival Live Updates :  १७ वर्षांनंतर पुन्हा मुंबईत विजय यात्रा अन् रोहितही...

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच महेंद्रसिंग धोनीच्या संघाने विश्वविजेतेपद मिळवले होते. त्यावेळी त्या विजयी संघाची विजयी यात्रा मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम अशी निघाली होती. विशेष म्हणजे, त्या संघात रोहित शर्माचा समावेश होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १७ वर्षांनंतर पुन्हा मुंबईत विजय यात्रा निघणार आहे.

Team India Arrival Live Updates : सेलिब्रेशनची तयारी पूर्ण! वर्ल्ड चॅम्पियन्सची बस विमानतळावरून निघाली आता थेट...

रोहित शर्मा आणि भारतीय खेळाडूंची पहिली झलक टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत समोर आली आहे. रोहित शर्माच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. टीम इंडिया विमानतळावरून निघून हॉटेलकडे रवाना झाली आहे. टीम बसमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविडसह सर्व खेळाडूंचा समावेश आहे. (Rohit Sharma-led Team India arrives back in country after T20 World Cup triumph)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com