T20 World Cup: रोबो वॉक करत हिटमॅनने उचलली ट्रॉफी, जय शाहसकट सगळे स्टेजवरून पळाले; टीम इंडियाचं भन्नाट सेलिब्रेशन Video

Rohit Sharma Celebration: भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उचलल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह भन्नाट सेलिब्रेशन केलं.
Rohit Sharma | Team India | T20 World Cup 2024
Rohit Sharma | Team India | T20 World Cup 2024Sakal

T20 World Cup 2024 Final, India vs South Africa: २९ जून २०२४... भारतीय क्रिकेट इतिहासात कायमस्वरुपी ही तारीख लक्षात ठेवली जाईल. याच दिवशी म्हणजे शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

शनिवारी बार्बाडोसच्या मैदानात झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केलं. यासह टी२० वर्ल्ड कप उंचावला.

दरम्यान, रोहिक शर्मा टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एमएस धोनीनंतरचा दुसराच कर्णधार ठरला. इतकंच नाही, तर २००७ साली जेव्हा भारताने धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा रोहित खेळाडू म्हणून त्या संघाचा भागही होता. त्यामुळे तो दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सर्व भारतीय खेळाडूंना विजेपदाचे मेडल्स देण्यात आले. यानंतर रोहित कर्णधार म्हणून मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलल्यानंतर ट्रॉफी घेण्यासाठी पोडियमवर येत होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह त्याला ट्रॉफी देण्यासाठी संघातील इतर खेळाडूंसह तिथे उभे होते.

याचवेळी रोहितने अनोखी कृती केली. तो रोबो सारखी अॅक्शन करत ट्रॉफी घेण्यासाठी आला. यावेळी त्याची ही कृती पाहून सर्वच जण हसायला लागले. दरम्यान, जय शाह यांनी ट्रॉफी रोहितकडे सोपवल्यानंतर मात्र इतर आधिकाऱ्यांसह स्टेजवरून लगेचच खाली पळाले. कारण भारतीय संघाला ट्रॉफीसह सेलिब्रेशन करायचे होते.

ही ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशनही केले. काही खेळाडू नाचले, तर तर उपकर्णधार हार्दिक पांड्यानेही त्याचं अनोखं सेलिब्रेशन केलं. ही ट्रॉफी जिंकत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट आणि रोहित यांनीही एकत्र तिरंगा पाठीवर घेत फोटो काढले.

तसेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने टी२० वर्ल्ड कप भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये नेला. द्रविडचाही प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा टी२० वर्ल्ड कल ठरला.

या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ८ बाद १६९ धावाच करता आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com