Team India Fan : हातात तिरंगा, छातीवर विराट तर पाठीवर....; विमानतळावर 'हा' चाहता ठरला लक्षवेधी

Team India Fans at Delhi IGI Airport
Team India Fans at Delhi IGI Airport
Updated on

Team India Fans at Delhi IGI Airport : टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. टीम इंडिया दिल्लीमध्ये विमानतळाजवळ टर्मिनल 3 वर आल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यादरम्यान चाहते मात्र खूप उत्साहित होते. टी-20 वर्ल्ड कप चॅंम्पियन टीम इंडिया भारतात परतली आहे. कर्णधार रोहितची फौज सकाळी ६ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचली. तिथे चाहत्यांनी हजेरी लावून टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत केले.

यामध्ये एक चाहता लक्षवेधी ठरला, ज्याने त्याच्या छातीवर विराटचे चित्र गोंदवले होते तर पाठीवर भारतीय संघाच्या खेळाङूंची नावे देखील गोंदवलेली होती. विमानतळावर जशी टीम इंङीया दिसली तसा चाहत्यांचा जल्लोष द्विगुणीत झाला.

रोहितची फौज इंदिरा गांधी विमानतळाच्या टर्मिनल 3 वर पोहोचली, आणि तिथून आयटीसी मौर्य हॉटेलकडे रवाना झाली. टीम इंडिया बार्बाडोसवरून लांब पल्ल्याचा प्रवासा करून आली होती तरी त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकवा दिसून आला नाही.

चाहत्यांना पाहून खेळाङूंच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसून आली. यादरम्यान धोनी आणि टीम इंडियाचा एक चाहता दिसला जो जवळजवळ 16 वर्षांपासून टीम इंङियाला समर्थन करताना दिसत आहे. तो मुंबईमध्ये होणाऱ्या विक्ट्री परेडमध्ये देखील सहभागी होणार आहे असे त्याने सांगितले.

विमानतळावर रोहीत शर्मा देखील टी-20 वर्ल्ङ कप उंचावताना दिसला, हे पाहून चाहत्यांनी ‘इंडिया-इंडिया’ चा नारा लावला. भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड बीसीसीआयने एक व्हिडियो शेअर केला आहे, ज्यात रोहित आणि विराट सोबत पूर्ण टीम इंडिया ट्रॉफीसोबत दिसून आली. टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते दिल्लीच्या विमानतळावर पोहोचले होते.

टीम इंडियाचा ४ जुलैचा कार्यक्रम

• गुरुवारी सकाळी 6 वाजता विमान दिल्लीत उतरले.

• भारतीय खेळाडू सकाळी 9.30 वाजता पीएम हाऊससाठी रवाना झाले.

• टीम इंडिया सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे.

• पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर खेळाडू मुंबईला चार्टर्ड फ्लाईटने जातील.

• मुंबईत उतरल्यानंतर सर्व खेळाडू खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.