T20 World Cup: है तैयार हम...! रोहित अन् हार्दिक पांड्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; BCCI ने शेअर केला 'तो' 2 मिनट 12 सेंकदाचा Video

Team India Practice: टी20 वर्ल्ड कपसाठी हार्दिक पांड्याही भारतीय संघाशी जोडला गेल्या असून सरावालाही सुरुवात झाली आहे.
Team India Practice Session
Team India Practice SessionSakal
Updated on

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सराव सामन्यांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच संघांची वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत या स्पर्धेच्या दृष्टीने अंतिम तयारी सुरू आहे.

भारतीय संघातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही न्युयॉर्कला पोहचले आहेत. काही भारतीय खेळाडू 25 मे रोजी, तर काही 28 मे रोजी भारतातून न्युयॉर्कला गेले आहेत.

त्यानंतर आता एक दिवस विश्रांती केल्यानंतर भारतीय खेळाडूंनी हळुहळू सरावालाही सुरुवात केली आहे. न्युयॉर्कमध्ये पोहचल्यानंतर भारतीय संघाच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

दरम्यान, भारताच्या पहिल्या सराव सत्राबद्दल भारताचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई म्हणाले, सध्या येथील वातावरणाशी आणि टाईम झोनशी जुळवून घेत आहोत. तसेच त्यांनी सांगितलं की साधारण अडीच महिने खेळाडू त्यांच्यापासून दूर होते, त्यामुळे आता त्यांच्यावर काय काम करावे लागणार आहे, याचा विचार करत आहोत.

Team India Practice Session
Hardik Pandya-Natasa Stankovic : हार्दिक-नताशामुळे चर्चेत आलेला ‘हा’ विवाहपूर्व करार आहे तरी काय? वाचा सविस्तर

तसेच शुभमन गिलने सांगितले की 'अजून आम्ही इथे क्रिकेट खेळलेलो नाहीये, पण आज आम्ही इथे टीम ऍक्टिव्हिटीसाठी आत्ता आलो आहे.'

या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्माही सर्व खेळाडूंसह सराव करताना दिसत असून उपकर्णधार हार्दिक पांड्याही संघाशी जोडला गेला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक आयपीएल 2024 नंतर लंडनला काही काळासाठी गेला होता. त्यानंतर तो तिथूनच न्युयॉर्कमध्ये आला आहे.

तथापि, अद्याप स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय संघाशी जोडला गेलेला नाहीये. मिडिया रिपोर्ट्सनुसार त्याने आयपीएल 2024 नंतर छोट्या सुटीची मागणी केली होती, जी बीसीसीआयने मान्य केली. त्यामुळे तो आता 30 मे रोजी भारतीय संघाशी जोडला जाण्याची शक्यता आहे.

भारताचा या टी20 वर्ल्ड कपसाठी सराव सामना 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे, तर स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे.

Team India Practice Session
IPL 2024 : थोडी खुशी जादा गम! आयपीएलमध्ये संधीचे सोने करणारे विदर्भातील पोट्टे
  • टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

  • राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

टी20 वर्ल्डकप 2024 च्या पहिल्या फेरीतील भारतीय संघाचे सामने (वेळ - भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता)

5 जून (बुधवार) - भारत विरुद्ध आयर्लंड, नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम, न्यूयॉर्क

9 जून (रविवार) - भारत विरुद्ध पाकिस्तान, नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम, न्यूयॉर्क

12 जून (बुधवार) - भारत विरुद्ध अमेरिका, नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम, न्यूयॉर्क

15 जून (शनिवार) - भारत विरुद्ध कॅनडा, सेंट्रल ब्रोवॉर्ड रिजनल पार्क स्टेडिअम टर्फ ग्राऊंड, फ्लोरिडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.