Team India Victory Parade : झोमॅटोने मुंबईकरांची मागितली माफी ते KL राहुल का झाला ट्रेण्ड? ‘सोशल मीडिया’ नेमकं काय काय झालं व्हायरल?

Team India Victory Parade : भारताच्या रोहित ब्रिगेडने १७ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. वेस्टइंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला.
Team India Victory Parade Social Media Trends
Team India Victory Parade Social Media Trends SAKAL

Team India Victory Parade Social Media Trends : भारताच्या रोहित ब्रिगेडने १७ वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले. वेस्टइंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. यानंतर गुरुवारी भारतीय संघ भारतात परतला. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर संघ मुंबईसाठी रवाना झाला.

टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय संघाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. मरिन ड्राईव्हपासून रोड शोनंतर प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर संघाचा सत्कार करण्यात आला.

वानखेडे स्टेडियमवर जागा मिळेल तिथे क्रिकेटप्रेमी उभा होता. भारतीय संघाच्या स्वागतासाठी सोशल मीडियादेखील क्रिकेटमय झाला होता. रोहित शर्मा, हार्दीक पांड्या, विजयी झेल घेणारा सूर्या तर शांतीत क्रांती करणारा राहुल द्रविड यांचे कौतुक सोशल मीडियावर होत होते.

Team India Victory Parade Social Media Trends
Team India Victory Parade : गुजरातच्या बसवरून राजकारण तापलं! मुंबई बेस्टकडे ओपन डेकर नसल्यानं संधी गमावली?

टीम इंडिया #VictoryParade -

काल दिवसभर #VictoryParade सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्रेण्ड करत होता. भारतीय संघाच्या स्वागतासाठी लोक रस्त्यावर उभे होते, तर टीव्हीवर दिसणारे खेळाडू समोर असल्याचे पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या चाहत्यांना खेळाडू अभिवादन करत होते.

मुंबईचा राजा ‘रोहित शर्मा’

भारतीय संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा व्हिक्टरी परेडचा केंद्रबिंदू होता. रोहितने विश्वचषकात मोठी खेळी केली. मुंबईचा रहिवासी असल्याने मोठी सहानुभूती रोहित शर्मासोबत होती. त्यामुळे सोशल मीडियावरदेखील दिवसभर #RohitSharma ट्रेण्ड राहिला.

१९८३चा फोटो व्हायरल

खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रॉफीला हात लावला नाही. यामुळे मोदींचे खूप कौतुक झाले. दुसरीकडे, १९८३च्या विश्वचषकानंतर काढलेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला. टीम इंडियाने १९८३ मध्ये पहिला आयसीसी विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर इंदिरा गांधींनीही विश्वचषक विजेत्या संघासोबत फोटोशूट करून घेतले आणि त्या वर्ल्डकप ट्रॉफी हातात घेऊन उभ्या राहिल्या होत्या.

Team India Victory Parade Social Media Trends
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या स्वागतासाठी 'बेस्ट'ची बस का नाही? गुजरातची बसच का? रोहित पवारांचा सवाल

रिषभ पंत आणि पंतप्रधानांची गळाभेट

रिषभ पंतची मोदींनी गळाभेट घेतली. अपघातानंतर रिषभने ज्याप्रकारे संघात आपले स्थान कायम केले ते सर्वांना प्रेरणा देणारे होते. त्यामुळे त्याची खास गळाभेट मोदींनी घेतली.

जसप्रीत बुमरा

जसप्रीत बुमराचा मुलगा अंगदला कडेवर घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. जसप्रीत बुमरा विश्वचषकात मालिकावीर ठरला. त्याने १५ विकेट पटकावल्या होत्या.

केएल राहुल का झाला ट्रेण्ड?

बीसीसीआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडियाची जर्सी गिफ्ट केली. या जर्सीचा नंबर १ होता आणि केएल राहुलच्या जर्सीचा नंबरदेखील १ होता. त्यामुळे संघातून स्थान गमावले आता जर्सीदेखील गमावली, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होती.

हार्दिकचा जयघोष

आयपीएलमध्ये मुंबईचा कर्णधार झाल्यामुळे हार्दिक पंड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मुंबईचे चाहते यात आघाडीवर होते. मात्र, संपूर्ण वानखेडेवर काल गुरुवारी ‘हार्दिक हार्दिक’ असा जयघोष होता.

तुम्हाला २००७ आठवते का?

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७ मध्ये विश्वचषक जिंकला होता. तेव्हा संघाची मुंबईत विजयी परेड काढण्यात आली होती. खेळाडूंच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे २००७चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठी अभिनेत्यांचा जल्लोष

अनेक मराठी अभिनेत्यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत भारतीय संघाचे मुंबईत स्वागत केले. प्रथमेश परब, ऐश्वर्या नारकर यांनी रोहित ब्रिगेड व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवले होते.

झोमॅटोकडून सॉरी

फूड डिलीव्हरी ॲप झोमॅटोने मुंबईकरांची माफी मागितली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींनी मुंबईत तोबा गर्दी केली, त्यामुळे झोमॅटोने ‘सॉरी मुंबई, आज थोडी देर होगी’, अशी एक्सवर पोस्ट केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com