ICC on Men's and Women's T20 World Cup: आयसीसीची नुकतीच वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये महिला टी२० वर्ल्ड कपबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत महिलांच्या क्रिकेट विकाराबाबत चर्चा झाली असून साल २०३० मध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपमध्ये १६ महिला संघ खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबरोबर महिला आणि पुरुष क्रिकेट यांच्यात समानता राखण्याचीही वचनबद्धता पाळली जाईल असं सांगितलं आहे.
साल २००९ मध्ये महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्यावेळी ८ संघ सहभागी झाले होते. त्यानंतर २०१६ साली सहभागी संघांची संख्या १० करण्यात आली. त्यानंतर आता २०२६ मध्ये सहभागी संघांची संख्या १२ होणार असून २०३० पर्यंत १६ संघ सहभागी होतील, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
याशिवाय २०२६ महिला टी२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्यासाठी अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ असणार आहे, हे देखील आयसीसीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २०२६ साली भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये मिळून २०२६ पुरुष टी२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये २० संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी ८ स्थानिक क्लालिफिकेशन स्पर्धा असणार आहेत.
दरम्यान, 12 संघ थेट पात्र ठरले आहेत, परंतु 8 संघांना क्वालिफायर्स खेळून पात्रता मिळवावी लागणार आहे. नव्या पद्धतीप्रमाणे आफ्रिका आणि युरोप क्लालिफायर्समधून प्रत्येकी २ संघ, अमेरिका क्वालिफायरमधून एक संघ, तसेच आशिया आणि इस्ट आशिया पॅसिफिक यांच्या एकत्र क्वालिफायरमधून तीन संघ २०२६ पुरुष टी२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहे.
सध्या भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, बांग्लादेश, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड हे १२ संघ थेट पात्र ठरले आहेत.
दरम्यान, आयसीसीची ही बैठक गेले चार दिवस कोलंबोमध्ये सुरू होती. यामध्ये १०८ आयसीसी सदस्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या सहभागावरही चर्चा झाली आहे.
तसेच आयसीसीने असेही सांगितले की पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा रिव्ह्यु रॉजर टूसे, लॉसन नायडू आणि इम्रान ख्वाजा या तीन संचालकांच्या देखरेखीखाली केला जाईल, त्यानंतर त्याचा अहवाल बोर्डाला दिला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.