इंग्लंडच्या संघाने बांगलादेशला ८ गडी राखून दणका दिला. मुश्फीकूर रहीमच्या सर्वाधिक २९ धावांच्या खेळीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात कशीबशी १२४ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र हे माफक आव्हान इंग्लंडने सहज पार केले. सलामीवीर जेसन रॉयच्या दमदार अर्धशतकामुळे (६१) इंग्लंडला सामना जिंकणं अधिक सोपं गेलं. अखेरच्या टप्प्यात डेव्हिड मलानने नाबाद २८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात एक घटना चांगलीच चर्चिली गेली.
इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी सातव्या षटकात महमदुल्लाह गोलंदाजी करत होता. समोर जेसन रॉय चांगल्या फॉर्मात होता. त्याने पुढे येऊन गोलंदाजाच्या डोक्यावरून हवाई फटका खेळला. त्याचा फटका थेट मैदानाबाहेर जाईल असं वाटत असतानाच सीमारेषेवर फिल्डिंग करणारा नईम धावत आला आणि त्याने अतिशय चपळाईने झेल घेण्यासाठी हवेत झेप घेतली. पण त्याला झेल मात्र टिपता आला नाही.
पाहा नईमचा तो व्हिडीओ-
दरम्यान, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना खूपच सुमार कामगिरी केली. मुश्फीकूर रहीमच्या २९ धावांव्यतिरिक्त नासुम अहमदच्या नाबाद १९ धावा आणि महमदुल्लाहच्या १९ धावांच्या याच्या मदतीने बांगलादेशच्या संघाने कसाबसा १२०चा टप्पा पार केला. टायमल मिल्सने इंग्लंडकडून सर्वाधिक ३ बळी टिपले. बांगलादेशने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉयने दमदार फलंदाजी केली. जॉस बटलरने उपयुक्त १८ धावांची खेळी केली. त्यानंतर डेव्हिड मलानने शेवटपर्यंत खेळपट्टी सांभाळली आणि संघाला विजय मिळवून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.