Pakistan Cricket Team : पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला? पाकिस्तानमधील माध्यमांचा दावा

T20 World Cup 2024: पाकिस्तानात संघाच्या कामगिरीवर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket Team T20 World Cup 2024 esakal
Updated on

Pakistan Cricket Team T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेट संघाची यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचे सुपर 8 मध्ये जाण्याचे वांदे झाले आहेत. पाकिस्तानचा संघ युएसएकडून आणि भारताकडून पराभूत झाला आहे. त्यांनी कॅनडाविरूद्ध सामना जिंकला असला तरी त्यांचे पुढच्या फेरीतील स्थान जर तरवर अवलंबून असणार आहे.

दरम्यान, पाकिस्तान संघाच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. पाकिस्तान संघाचा एक वकील चाहता खूपच नाराज झाला आहे. पाकिस्तानच्या गुजरानवाला भागातील या वकिलाने पाकिस्तान संघावर थेट देशद्रोहाखाली खटला चालवण्यात यावा यासाठी याचिका दाखल केली आहे. ही माहिती लोकल वृत्तसंस्था अरब न्यूजने दिली आहे.

Pakistan Cricket Team
Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरने रचला इतिहास! ICC स्पर्धेत असे करणारा पहिला ठरला गोलंदाज

यासंदर्भात पाकिस्तानातील प्रसिद्ध न्यूज चॅनल समा टीव्हीनेही वृत्त दिले. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्याने देशाच्या संघाने केलेल्या कामगिरीबाबत काळजी व्यक्त केली आहे. त्याने हा देशाच्या पैशाचा अपव्य असून त्यांनी देशाचा विश्वासघात केल्या आहे असा दावा करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्याने संघावर लाखो रूपये आणि देशाची अखंडता धोक्यात घातली आहे. संघातील खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाने देशाच्या सन्मानापेक्षा आर्थिक फायद्याला जास्त महत्व दिल्याचा आरोप केला आहे.

Pakistan Cricket Team
USA vs IND : भारतानं तारलं मात्र युएसए, आयर्लंड मारणार; पाकिस्तान टीम इंडियाच्या विजयानं इतका का खूश झाला?

याचिकेत अमेरिका आणि भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळं देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं चौकशी होईपर्यंत पाकिस्तान संघावर बंदी घालावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोर्टाने देखील या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांना या प्रकरणी 21 जूनपर्यंत तक्रार दाखल झाल्यासंदर्भातील रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.