USA vs IRE : युएसए - आयर्लंड सामन्याच्या नाणेफेकीला उशीर; पाकिस्तानच्या घशाला पडली कोरड

T20 World Cup 2024 : युएसए - आयर्लंड सामन्यापूर्वी तुफान पाऊस झाला आहे. त्यामुळे मैदान ओलं असून नाणेफेकीस उशीर होत आहे.
Babar Azam
USA vs IRE T20 World Cup 2024 esakal
Updated on

USA vs IRE T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये आज यजमान युनायटेड स्टेट्स आणि आयर्लंड यांच्यात सामना रंगत आहे. फ्लोरिडामध्ये होणाऱ्या या सामन्याच्या नाणेफेकीला ओल्या मैदानामुळे विलंब होत आहे. ग्रुप A मधील या सामन्याकडे फक्त या दोन संघातील चाहत्यांच नाही तर पाकिस्तानी चाहत्यांच देखील लक्ष आहे. आजच्या सामन्यात जर पाऊस पडला तर पाकिस्तानचे सुपर 8 गाठण्याचे स्वप्न याच पाण्यात वाहून जाणार आहे.

दरम्यान, सामन्यापूर्वी फ्लोरिडा स्टेडियमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोवरून पाकिस्तानच्या संघाचे टेन्शन प्रचंड वाढले आहे. या फोटोवरून जरी सध्या स्टेडियममध्ये पाऊस पडत नसला तरी आधी पाऊस पडून गेल्यानं स्टेडियमला तळ्याच स्वरूप आलं आहे. अशा परिस्थितीत सामना सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे.

Babar Azam
IND vs CAN Playing 11 : रोहित विराटबाबत घेणार मोठा निर्णय? 3 सामन्यात फेल गेल्यानंतर...

पाकिस्तानला का आलयं टेन्शन?

पाकिस्तान आणि युएसए या दोन संघात ग्रुप A मधून सुपर 8 गाठण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. युएसएने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव करत चार गुण मिळवले आहेत. तर युएसएला भारताकडून पराभव सहन करावा लागला होता. आजच्या सामन्यात जर युएसएने आयर्लंडचा पराभव केला तर ते 6 गुणांसह सुपर 8 साठी पात्र होतील.

दुसरीकडे पाकिस्तानला भारत आणि युएसएने मात दिल्यानं त्यांची सुपर 8 मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांनी कॅनडाविरूद्धचा सामना जिंकला आहे. आता त्यांना आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकणे गरजेचे आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर पाकिस्तानचे 4 गुण होतील. तसेच युएसएने आयर्लंडकडून पराभवूत व्हायला हवं. तरच त्यांचे सुपर 8 गाठण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तिथंही युएसए आणि पाकिस्तान या दोघांचे समान 4 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेटचा मोठा रोल राहणार आहे.

Babar Azam
T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलिया मुद्दाम हरणार? अखेर कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितलं काय करणार?

मात्र पाकिस्तानची ही उरली सुरली आशा पाऊस संपुष्टात आणू शकतो. जर युएसए आणि आयर्लंड यांच्यातील सामना वॉश आऊट झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. युएसएचे 5 गुण होतील. त्यामुळं पाकिस्ताननं आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकूनही त्यांना वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळावा लागणार आहे.

युएसए आणि आयर्लंड सामन्याच्या नाणेफेकीला वेट आऊट फिल्डमुळे विलंब झाला आहे. मैदानाला जवळपास तळ्याच स्वरूप आल्यानं सामना लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यात पहिल्या इनिंगनंतर देखील पावसाची शक्यता असल्यानं पाकिस्तानी चाहत्यांचे टेन्शन जाम वाढले आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.