USA vs IND T20 WC 2024 : सूर्या तळपला; बॉल टू रन मॅचमध्ये केली संयमी खेळी, भारताचा सुपर 8 मध्ये प्रवेश

United State Vs India T20 World Cup 2024 : भारताला ग्रुपमध्ये टॉप करण्याच्या दृष्टीने आज विजय गरजेचा होता. भारताने युएसएचा 7 विकेट्सनी पराभव करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
Suryakumar Yadav
USA vs IND T20 WC 2024 esakal
Updated on

United State Vs India T20 World Cup 2024 : भारताने युएसएचा 7 विकेट्सनी पराभव करत गाठले सुपर 8 

भारताने युएसएचे 111 धावांचे आव्हान 19 व्या षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत सुपर 8 मधील आपलं स्थान पक्क केलं. भारत आता सुपर 8 मध्ये 24 जून रोजी ऑस्ट्रेलियासोबबत भिडण्याची शक्यता आहे.

युएसएचे 111 धावांचे आव्हान पार करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. त्यांचे दोन फलंदाज पहिल्या तीन षटकातच माघारी गेले होते. मात्र सूर्यकुमार यादवने (49 चेंडूत 50 धावा) अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याला शिवम दुबेने नाबाद 31 धावांचे योगदान दिलं. युएसएकडून सौरभ नेत्रावळकरने दमदार गोलंदाजी करत रोहित आणि विराट कोहलीला बाद केलं.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने युएसएला 20 षटकात 8 बाद 110 धावात रोखले. भारताकडून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याला हार्दिक पांड्याने 2 तर अक्षर पटेलने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक 27 धावा केल्या. त्या खालोखाल टेलरने 24 तर कोरे अँडरसनने 14 धावा केल्या.

USA vs IND T20 WC 2024 Live : सूर्या तळपला; बॉल टू रन मॅचमध्ये केली संयमी खेळी

सूर्यकुमार यादवने शेवटच्या 5 षटकात चांगली फटकेबाजी करत भारताला बॉल टू रन आलेल्या सामन्यात विजय मिळवून दिला. त्याने शिवम दुबेसोबत अर्धशतकी भागीदारी रचली.

USA vs IND T20 WC 2024 Live : भारताची संथ फलंदाजी; सूर्या अन् दुबेवरच मदार

भारताने 14 षटकात 3 बाद 67 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 36 चेंडूत 44 धावा करायच्या आहेत.

USA vs IND T20 WC 2024 Live : ऋषभ पंतही झाला बाद; भारताला तिसरा धक्का

अलीने 20 चेंडूत 18 धावा करणाऱ्या ऋषभ पंतचा त्रिफळा उडवत भारताला तिसरा धक्का दिला.

USA vs IND T20 WC 2024 Live : सौरभचे भारताला दोन तगडे धक्के; विराट पाठोपाठ रोहितही बाद

सौरभ नेत्रावळकरने भारताला सुरूवातीलाच दोन मोठे धक्के दिले. त्याने विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद केलं. तर रोहित शर्माला 3 धावांवर बाद करत भारताची अवस्था 2 बाद 10 अशी केली.

USA vs IND T20 WC 2024 Live : युएसएविरूद्ध अर्शदीपचा जलवा; निम्मा संघ एकट्यानेच संपवला

अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या यामुळे युएसएची अवस्था 7 बाद 100 धावा अशी झाली.

USA vs IND T20 WC 2024 Live : अखेर इंडियाला मिळाली नितीश कुमारची विकेट; सिराजचा भन्नाट कॅच

नितीश कुमारने 23 चेंडूत 27 धावा करत टीम इंडियाला टेन्शन दिलं होतं. मात्र अर्शदीपच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने भन्नाट कॅच घेत युएसएला पाचवा धक्का दिला. युएसएची अवस्था 5 बाद 81 अशी झाली.

USA vs IND T20 WC 2024 Live : युएसएचा जवळपास निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; हार्दिकनंतर अक्षरनेही दिला धक्का

अक्षर पटेलने स्टीव्हन टेलरचा त्रिफळा उडवत युएसएची अवस्था 4 बाद 56 धावा अशी केली.

USA vs IND T20 WC 2024 Live : युएसएची संथ सुरूवात; पांड्यानेही दिला मोठा धक्का

पॉवर प्लेमध्ये युएसएने 18 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने अॅरोन जोन्सला 11 धावांवर बाद केलं.

USA vs IND T20 WC 2024 Live : अर्शदीपने युएसएला पहिल्याच षटकात दिले दोन धक्के

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर जहांगीरला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर आंद्रियाज गौसला 2 धावांवर बाद केले.

USA vs IND T20 WC 2024 Live : युएसएविरूद्ध भाराताने नाणेफेक जिंकली; रोहितने केला का संघात बदल?

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात कोणता बदल केलेला नाही. मात्र युएसएच्या संघाचा कर्णधारच बदलला आहे. मोनार्क पटेल आजचा सामना खेळणार नाहीये.

हेड टू हेड : IND vs USA

भारत आणि युएसए हे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये एकमेकांविरूद्ध कधी खेळलेले नाहीत. त्यामुळे जो संघ जिंकले तो खातं उघडणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.