T20 World Cup: सुपर ओव्हरचा थरार अन् पाकिस्तानचा पराभव, अमेरिकेनं असा केला विजयाचा जल्लोष; पाहा Video

USA vs Pakistan Super Over Thrill: अमेरिका संघाने टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का दिला.
USA vs Pakistan | T20 World Cup
USA vs Pakistan | T20 World CupeSakal
Updated on

USA vs Pakistan: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत गुरुवारी अमेरिका विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला. डेलासला झालेल्या या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 5 धावांनी पराभूत करत या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. या विजयानंतर यजमान अमेरिका संघानं जोरदार सेलीब्रेशन केले.

अमेरिका आणि पाकिस्तान पहिल्यांदाच गुरुवारी आमने-सामने आले होते. या सामन्यात 20-20 षटकांनंतर दोन्ही संघांनी 159 धावा केल्याने बरोबरी झाली होती. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.

USA vs Pakistan | T20 World Cup
Saurabh Netravalkar: पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारणाारा सौरभ मुंबईतून कसा पोहचला अमेरिकेत? जाणून घ्या प्रवास

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेकडून ऍरॉन जोन्स आणि हरमीत सिंग फलंदाजीला उतरले. तर पाकिस्तानकडून अनुभवी गोलंदाज मोहम्मद अमीर गोलंदाजीला उतरला. मात्र जोन्स आणि हरमीतने अमीरविरुद्ध 18 धावा चोपल्या.

त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि फखर जमान फलंदाजीला उतरले, तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकर गोलंदाजी करत होता.

त्याच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही, मात्र दुसऱ्या चेंडूवर इफ्तिखारने चौकार मारला. तिसऱ्या चेंडू वाईड गेल्याने सौरभने पुन्हा टाकला आणि इफ्तिखारला बाद केलं. चौथा चेंडूही वाईड झाल्याने पुन्हा त्याला टाकावा लागला, ज्यावर शादाब खानने चौकार मारला. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा निघाल्या.

त्यामुळे अखेरच्या चेंडूत पाकिस्तानला विजयासाठी 7 धावांची गरज होती. पण शादाबला एकच धाव घेता आली आणि अमेरिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

अमेरिकेने हा विजय मिळवसाच डगआऊटमध्ये बसलेला अमेरिकेचा संघ मैदानात धावत आला आणि त्यांनी जोरदार आनंद साजरा केला. या विजयासह अमेरिकेने सुपर-८ मध्ये पोहचण्यासाठी भक्कम दावेदारी ठोकली आहे.

USA vs Pakistan | T20 World Cup
Nassau Stadium : अमेरिकेत खेळपट्टीचे ‘रोपटे’ रुजले नाही;नासाऊ स्टेडियमच्या मैदानाबाबतही प्रश्नचिन्ह,सामन्यांचा होतोय बेरंग

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला 20 षटकात 7 बाद 159 धावांवर रोखलं.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 44 आणि शादाब खानने 40 धावांची खेळी केली. अमेरिकेकडून नॉस्टुश केंजिगेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच सौरभने 2 विकेट्स घेतल्याय अली खान आणि जसदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेलाही 20 षटकात 3 बाद 159 धावाच करता आल्या. अमेरिकेकडून मोनांक पटेलने 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली. कतेच अँड्रिस गौसने 35 आणि ऍरॉन जोन्सने नाबाद 36 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद अमीर, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.