Pakistan Qualification Scenarios : पहिल्याच सामन्यात पराभव; पाकिस्तानच्या क्वालिफिकेशनचे झालेत वांदे, भारताला हरवलं तरी...

IND vs PAK T20 World Cup 2024 : पहिल्याच सामन्यातील पराभवामुळं पाकिस्तानची सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याच्या मनसुब्यांवर जवळपास पाणी फिरलं आहे.
Babar Azam
Babar Azam T20 World Cup 2024Sakal
Updated on

T20 World Cup 2024 : पाकिस्तानसाठी 6 जून हा दिवस अत्यंत वाईट ठरला. त्यांना नवख्या युएसएकडून पराभव पत्करावा लागला. सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात युएसएने पाकिस्तानचा पराभव करत यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील आपला दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानचा हा यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील पहिलाच सामना होता. मात्र पहिल्याच सामन्यात पराभव झाल्यानं त्यांच्या सुपर 8 मधील प्रवेशावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Babar Azam
Sourabh Netavalkar : मन उधाण वाऱ्याचे... पाकिस्तानला रडकुंडीला आणलेल्या सौरभ नेत्रावळकरचा स्विंग अन् सूरही एक नंबर

पाकिस्तान कसा होणार पात्र?

सुपर 8 मधील पाकिस्तानचा प्रवेश हा सध्याच्या घडीला एकमद सरळ आहे. त्यांना भारताविरूद्धचा सामना गमावून चालणार नाहीये. जर ते भारताकडून हरले तर त्यांचे सुपर 8 मध्ये सामील होण्याची चान्सेस फार कमी होतील. जर भारताने पाकिस्तानचा पराभव केला. दुसरीकडे युएसएने आयर्लंडला मात दिल्यावर पाकिस्तानचा खेळ खल्लास होणार आहे.

कारण जर युएसएचा भारताविरूद्धच्या सामन्यातला पराभव निश्चित पकडला तरी युएसएचे 6 गुण होतात. युएसएकडून हरणारा पाकिस्तान जर भारताकडून हरला तर त्यांना 4 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. ते आयर्लंड आणि कॅनडाविरूद्धचा सामना जिंकतील अस गृहीत धरलं तरी त्यांचे चार गुणच होतात.

पाकिस्ताननं भारताला हरवलं तर...

पाकिस्तानने जर रविवारच्या सामन्यात भारताचा पराभव केला तरी त्यांचे सुपर 8 मध्ये जाणे तितके सोपे राहणार नाही. ग्रुपमध्ये 5 संघ आहेत. भारत, पाकिस्तान आणि युएसए प्रत्येकी 6 गुण मिळवू शकतात. युएसएने पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंडला हरवलं. भारताने कॅनडा आयर्लंड आण युएसएला मात दिली अन् पाकिस्तानने भारत, कॅनडा आणि आयर्लंड यांना हरवलं तरी पाकिस्तानला घर गाठायला लागू शकतं.

कारण इथं नेट रनरेट पाहिलं जाईल आणि वरचे दोन संघ सुपर 8 साठी पात्र होऊ शकतील.

Babar Azam
Rahul Dravid: अमेरिकेत आंबेडकरांच्या विद्यापीठात पोहचले द्रविड आणि आगरकर, पुतळ्याला केले अभिवादन

पाऊस खेळ बिघडवू शकतो

भारत पाकिस्तान यांच्यातील 9 जून रोजी होणाऱ्या सामन्यातील वातावरण फार काही चांगलं नाहीये. सामन्यावेळी 42 टक्के पावसाची शक्यता आहे. जर सामना पूर्ण झाला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात येईल. जर पाकिस्तान आणि भारतीय संघ प्रत्येकी 5 गुणांवर राहिले तर नेट नरनेटवर सुपर 8 मध्ये कोण जाणार हे निश्चित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.