T20 World Cup: 'दिवाली हो या होली, अनुष्का लव्ह कोहली', भारताच्या सामन्यावेळी विराटला पाहून चाहत्यांच्या घोषणा, Video व्हायरल

Virat Kohli Viral Video: भारत विरुद्ध अमेरिका संघात न्युयॉर्कला झालेल्या सामन्यावेळी विराटला पाहून चाहत्यांनी अनोख्या घोषणा दिल्या होत्या.
Virat Kohli
Virat KohliSakal
Updated on

T20 World Cup 2024, India vs USA: भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बुधवारी (12 जून) अमेरिका संघाविरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने सुपर-8 फेरीतील स्थानही पक्के केले.

दरम्यान, हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी वैयक्तिकरित्या निराशाजनक राहिला. पण असे असले तरी त्याची जगभरात असलेली लोकप्रियता अमेरिकेतही पाहायला मिळाली. त्याच्या एक गमतीशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Virat Kohli
T20 World Cup 2024: अफगाणिस्तानचा PNG वर दणदणीत विजय अन् न्यूझीलंड थेट स्पर्धेतूनच बाहेर

झाले असे की अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना विराट सीमारेषेजवळ होता. त्यावेळी प्रेक्षक त्याला प्रोत्साहन देत होते.

याचवेळी काही प्रेक्षकांनी अनोख्या घोषणाही दिल्या. याचदरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात दिसते की विराटला पाहून काही प्रेक्षकांनी 'दिवाली हो या होली, अनुष्का लव्ह कोहली...' अशा घोषणा दिल्याय.

हे ऐकून विराटच्या चेहऱ्यावरही हलके हास्य आले. पण तो लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाला. दरम्यान, हा व्हायरल व्हिडिओ असून त्याची पुष्टी सकाळ करत नाही.

Virat Kohli
T20 World Cup 2024: इंग्लंडने अवघ्या 19 चेंडूत जिंकला सामना, सुपर-8 च्या आशाचीही उंचावल्या

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 110 धावा केल्या होत्या. अमेरिकेकडून नितीश कुमारने 27 धावांची खेळी केली. तसेच स्टीव्हन टेलरने 24 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने 2 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

त्यानंतर १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने 18.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 50 धावांची नाबाद खेळी केली. तसेच शिवम दुबेने 31 धावांची नाबाद खेळी केली. विराट या सामन्यात शुन्यावर बाद झाला, तर रोहित शर्मा 3 धावांवर बाद झाला होता.

अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अली खानने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.