Virat Kohli : कृपा करून विराटला... किंगच्या फ्लॉप शोनंतर एबी डिव्हिलियर्सने रोहित अन् राहुलकडं केली मोठी मागणी

T20 World Cup 2024 : विराट कोहली अफगाणिस्तानविरूद्ध सेट होऊन बाद झाला. त्यानंतर एबीडीने एक सल्ला टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला दिला.
Virat Kohli
Virat Kohli India Vs Afghanistan esakal
Updated on

Virat Kohli India Vs Afghanistan : टी 20 वर्ल्डकप सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात भारताचा मुकाबला अफगाणिस्तानशी होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 181 धावा केल्या. मात्र अफगाणिस्तानने भारताचे 8 फलंदाज देखील बाद केले. सलामीला आलेला रोहित शर्मा 8 तर विराट कोहली 24 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 24 चेंडूत 24 धावा केल्या.

विराटकडून आजच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ग्रुप स्टेजमधील खराब कामगिरीनंतर विराट दुहेरी आकड्यात पोहचला परंतु त्याची संथ खेळी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. दरम्यान, विराट कोहलीचा खास दोस्त आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने कर्णधार रोहित आणि कोच राहुल द्रविडकडे एक कळकळीची विनंती केली.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या यूट्यूब चॅनलवरून ही विनंती केली. तो म्हणतो की, 'मी कायम सांगत आलोय की कृपा करून विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवा. विशेषकरून चांगल्या खेळपट्टीवर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीला खेळण्याची सवय आहे.

तो आक्रमक खेळी करू शकतो. त्याचबरोबर तो गरज असताना खेळपट्टीवर टिकून खेळत दबावाच्या क्षणी सर्व प्रेशर हँडल करू शकतो. मधल्या षटकातील तो जगातील एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला सलामीला पाठवण्याचं कारण मला काही कळालं नाही.'

भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा आपला दुष्काळ संपवण्यासाठी आतूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर एबी डिव्हिलियर्सने ही विनंती केली आहे. त्याने संघाने अधिक आक्रमक खेळण्याची विनंती केली आहे. गेल्या काही आयसीसी स्पर्धा आणि वर्ल्डकपमध्ये भारत जास्त पारंपरिक वृत्तीने खेळला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()