T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Virat Kohli - Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर रोहितसोबतची एक खास आठवण विराटने शेअर केली आहे.
Rohit Sharma | Virat Kohli
Rohit Sharma | Virat KohliSakal

Virat Kohli Speech: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकलेल्या भारतीय संघाचं गुरुवारी (४ जुलै) जंगी स्वागत झालं. गुरुवारी दिल्लीत सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ संध्याकाळी मुंबईत दाखल झाला.

मुंबईमध्ये आल्यानंतर नरीमन पाँइंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यान भारतीय संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजय मिरवणूकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीयस संघाचा सत्कार सोहळा पार पडला. यादरम्यान काही भारतीय खेळाडूंनी आपापली मतंही व्यक्त केली.

स्टार फलंदाज विराट कोहलीने खास भाषण केले. बार्बाडोसमध्ये चॅम्पियन बनल्यानंतर तो आणि रोहित शर्मा कसे रडायला लागले हे त्याने सांगितले. विजयानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली होती. विराटने सांगितले की, 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने रोहितला इतका भावूक कधीच पाहिला नाही.

Rohit Sharma | Virat Kohli
Rohit, Virat, Jadeja Retirement: वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियात निर्माण झाली पोकळी! रोहित, विराट अन् जडेजाची जागा घेणार कोण?

सत्कार समारंभात विराट म्हणाला, "15 वर्षात पहिल्यांदाच मी रोहित शर्माला इतका भावूक होताना पाहिलं. सामन्यानंतर मी पायऱ्या चढत असताना तो रडत होता आणि मीही रडत होतो. त्यानंतर आम्ही एकमेकांना मिठी मारली.'

'आमच्यासाठी ही खूप खास आठवण असेल, मला वाटते की आम्ही जबाबदारी स्वीकारली आणि ट्रॉफी परत आणण्यापेक्षा दुसरे काहीही चांगले नाही."

2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरसह संघातील वरिष्ठ खेळाडू का रडत होते हे मला समजत नव्हते, असे विराट म्हणाला. तो म्हणाला की, आता तो स्वत: संघाचा सीनियर खेळाडू असल्याने त्याला याची जाणीव झाली.

Rohit Sharma | Virat Kohli
Virat Kohli Post: टी20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने काय केलेली पोस्ट, ज्याला इंस्टाग्रामवर मिळाले सर्वाधिक लाईक्स

भारतीय संघाला 125 कोटींचे बक्षीस

भारतीय संघाला 125 कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे. संघ चॅम्पियन झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी हे बक्षीस जाहीर केले. या पुरस्काराचा धनादेश भारतीय संघाला सत्कार समारंभात देण्यात आला.

विराट आणि रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी 2024 टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराटने अंतिम सामन्यानंतर लगेचच निवृत्ती जाहीर केली.

तसेच सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली. निवृत्ती घेताना या दोन्ही खेळाडूंनी निरोप घेण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही, असे म्हटले होते.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com