Ind vs Ire : ओपनिंगपासून ते मिडल ऑर्डरपर्यंत बदले टीम इंडियाचे चित्र... जाणून घ्या आयर्लंडविरुद्ध कशी असेल Playing-XI

India vs Ireland Playing 11 T20 World Cup 2024 : टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध 2024 टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे.
India vs Ireland Playing 11 T20 World Cup 2024
India vs Ireland Playing 11 T20 World Cup 2024sakal
Updated on

India Playing-11 T20 World Cup 2024: टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध 2024 टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल आणि दोघांनाही विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करायची आहे.

भारत हा सामना जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. हा सामना स्थानिक म्हणजेच न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळेल. या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया अतिशय मनोरंजक प्लेइंग इलेव्हन निवडू शकते.

India vs Ireland Playing 11 T20 World Cup 2024
IND vs PAK T20 World Cup : भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानला धक्का! स्टार अष्टपैलू जखमी, 'या' सामन्यातून बाहेर

रोहित शर्मासोबत कोहली देणार सलामी?

सर्वप्रथम विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपनिंगला दिसू शकतो. या सामन्यात यशस्वी जैस्वाल बाहेर असू शकतो. जैस्वाल संघात मुख्य सलामीवीर म्हणून खेळत असला तरी. आता अशा परिस्थितीत संघ कोणत्या जोडीसोबत सलामीला येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात संजू सॅमसन रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना दिसला होता.

India vs Ireland Playing 11 T20 World Cup 2024
R Ashwin Returns : IPL 2025पूर्वी धोनीच्या चेन्नईमध्ये परतणार आर अश्विन; फ्रँचायझीने दिली 'ही' मोठी जबाबदारी

ऋषभ पंत आणि संजू सॅमसन?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये दोन्ही यष्टीरक्षक म्हणजेच ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना आयर्लंडविरुद्ध संधी मिळू शकते. ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर, तर संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर, हार्दिक पांड्याच्या आधी दिसू शकतो.

खेळपट्टीचा रंग पाहता रोहित शर्मा कोणत्या गोलंदाजीसह उतरू इच्छितो हे पाहणे बाकी आहे. मात्र रोहित शर्मा तीन फिरकीपटूंसोबत गेल्यास मोहम्मद सिराजला बाहेर बसावे लागू शकते. कारण तीन फिरकीपटूंसह कर्णधार उजव्या हाताचा जसप्रीत बुमराह आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांची संघात निवड करू शकतो, जेणेकरून डावी-उजवी संयोजन तयार करता येईल.

India vs Ireland Playing 11 T20 World Cup 2024
IND VS IRE : भारताची मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला रोहितसेना सज्ज; आयर्लंडविरुद्ध सलामी

बुमराह आणि अर्शदीपसह हार्दिक पांड्या तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून काम करेल. अशा स्थितीत रोहित शर्माला तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरवण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे प्रमुख फिरकीपटू असू शकतात आणि जडेजा अष्टपैलू म्हणून तिसरा फिरकी गोलंदाज होऊ शकतो.

आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com