Virat Kohli Takes Flight to London : विजय परेडनंतर रात्री अचानक विराट कोहली लंडनला रवाना, मोठं कारण आलं समोर

17 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
Virat Kohli Takes Flight to London
Virat Kohli Takes Flight to Londonsakal
Updated on

Virat Kohli takes flight to London : 17 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवत भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. यापूर्वी 2007 मध्ये भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मुंबईत विजयी परेड काढली, जिथे खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

Virat Kohli Takes Flight to London
Team India Parade: हा तर शुद्ध वेडेपणा! दुसरे हाथरस घडले असते; टीम इंडियाच्या मिरवणुकीवर सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला. खेळाडूंनीही मैदानावर फेरफटका मारला आणि चाहत्यांसोबत वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा केला. रोहित शर्मा आणि विराट कोहली डान्स करताना दिसले. नंतर ज्यामध्ये विराट कोहली वंदे मातरम गाताना सर्वात पुढे होता. विजय परेडनंतर किंग कोहली लंडनला रवाना झाला होता, त्याचे मुख्य कारणही समोर आले आहे.

Virat Kohli Takes Flight to London
Virat Kohli Takes Flight to London : विजय परेडनंतर रात्री अचानक विराट कोहली लंडनला रवाना, मोठं कारण आलं समोर

मुंबईतील विजय परेड संपल्यानंतर विराट कोहली विमानतळावर दिसला. खरं तर, किंग कोहली लंडनला रवाना झाला. कारण अनुष्का शर्मा, वामिक आणि अकाय लंडनमध्ये आहेत, त्यामुळे विराट कोहली लंडनला त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेला आहे. याआधी विराटने दिल्लीत भाऊ आणि बहिणीसोबत चांगला वेळ घालवला होता. विराटला जेव्हा-जेव्हा क्रिकेटमधून वेळ मिळतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवायला आवडतो.

Virat Kohli Takes Flight to London
'मां तुझे सलाम...', विराट-हार्दिकने तयार केला माहौल! वानखेडेवर 'वंदे मातरम'चा गजर; BCCI शेअर केला 'तो' Video

इतकेच नाही तर सामना जिंकल्यानंतर विराट कोहली अनेकदा अनुष्का शर्मासोबत व्हिडिओ कॉल करताना दिसला आहे. वर्ल्ड कप फायनल जिंकल्यानंतर कोहलीने तेच केले. अंतिम सामन्यात विराट कोहलीने 76 धावांची शानदार खेळी करत भारताला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या खेळीसाठी कोहलीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. एवढेच नाही तर कोहलीने वर्ल्ड कप फायनलनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.