Virender Sehwag: ‘रोको’ची जागा कोण घेणार? सेहवागने सांगितली ‘मन की बात’

Virender Sehwag on Rohit Sharma and Virat Kohli Replacement: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम केला. तर आता त्या दोघांची जागा घेईल? याबद्दल वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.
Virender Sehwag
Virender Sehwag Rohit Sharmaesakal
Updated on

Virender Sehwag: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम केला. तर आता त्या दोघांची जागा घेईल? याबद्दल वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीमने टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकला. रोहित सेनेने तब्बल 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ मोडून काढत भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यावेळी रोहित आणि विराट यांनी टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना मोठा धक्का दिला.

यासोबतच ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा याने देखील टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली. आता टॉप ऑर्डरवर खेळणाऱ्या रोहित अन् विराटची जागा कोण घेणार यावर चर्चा होत आहे.

विरेंद्र सेहवाग यांनी रोहित आणि विराटची जागा तसेच टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी काय प्लॅन असला पाहिजे यावर आपलं मत मांडलं आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.

Virender Sehwag
ZIM vs IND 1st T20I : युवराजच्या लाडक्याचा पहिल्याच सामन्यात भोपळा; जगज्जेतेपदानंतर पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव

कामगिरी कशी असेल यावर लक्ष

झिम्बाब्वे दौऱ्यावर असे अनेक खेळाडू आले आहेत, ज्यांची आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे.

क्रिकबझवरील एका कार्यक्रमात सेहवागला झिम्बाब्वेला गेलेल्या युवा खेळाडूंबद्दल विचारले असता तो म्हणाला, "आंतरराष्ट्रीय निवड देशांतर्गत होते. झिम्बाब्वे दौऱ्यात कामगिरी करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यास पात्र आहे की नाही हे पाहण्याजोगे आहे.

2010 मध्ये असं होतं की, जी नवीन टीम झिम्बाब्वेविरुद्ध खेळायली जात होती ती जिंकून येत असायची तशीच ही मालिका सुद्धा नक्कीच जिंकू ".

Virender Sehwag
Rahul Dravid : विश्‍वविजेत्या संघाच्या माजी प्रशिक्षकांनी उलगडले यशाचे रहस्य

टॉप-3 मध्ये बदल झाला तर...

सेहवाग पुढे म्हणाला की, "चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना पुढच्या ओळीत टाकले जाते. पुढील टी-20 विश्वचषकासाठी निवडकर्ते हे लक्षात ठेवतात की कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी छाप सोडली. झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसारख्या दौऱ्यांवर कामगिरी करुन निवृत्त झालेले खेळाडूंना टी-20 संघात घेऊ शकतात.

ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे हे मधल्या फळीत असू शकतात. निवडकर्ते तपासतील की टॉप 3 मध्ये कोण येऊ शकतं. रोहित आणि कोहली बाहेर पडल्यानंतर त्यांची जागा कोण घेईल, कदाचित हाच विचार करुन झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या भारतीय संघाची निवड झाली असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.