T20 World Cup : पुरेशा धावा केल्या नाही, हेच खरे कारण

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेची पहिली सहा षटके महत्त्वाची असतात
Gavaskar
Gavaskar sakal media
Updated on

दुबई : ताकवर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपले फलंदाज पुरेशा धावा करू शकले नाहीत, हेच भारताच्या टवेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी मोहिमेचे कारण आहे, असे माजी विश्वविक्रमी फलंदाज सुनील गावसकर यांनी सांगितले.

Gavaskar
थँक्स कॅप्टन कोहली आणि कोच शास्त्री, टीम इंडियाने दिला विजयी निरोप

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेची पहिली सहा षटके महत्त्वाची असतात. या षटकांमध्ये खेळण्याचा दृष्टिकोन आपल्या फलंदाजांनी बदलण्याची गरज असल्याचे गावसकर म्हणाले. ज्या पद्धतीने पाकिस्तान आणि न्यूझीलंड गोलदाजांनी भारतीय फलंदाजांना रोखले, त्यावरून आपल्या फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. त्याचे वळी सायंकाळी पडणाऱ्या दवामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे होते, असे गावसकर म्हणतात.

नाणेफेक जिंकणे आपल्या हाती नसते आणि त्यामुळे दुसऱ्या डावात दव पडलेले असताना गोलंदाजी करणे अवघड असते, हे सत्य असले तरी प्रथम फलंदाजी करताना जर आपण १८० च्या आसपास धावा केल्या, तर २० ते ३० धावांचे अतिरिक्त पाठबळ मिळते, त्याचा फायदा होतो; तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपला संघ १११ धावाच करू शकत असेल, तर दवाचा प्रश्नच उपस्थित होत नाही, अशीही टीका गावसकर यांनी केली.

साखळी स्पर्धेतच आव्हान संपुष्टात आल्यामुळे आता भारतीय संघ घाऊक बदल करण्याची गरज नाही. केवळ पॉवरप्लेमध्ये कसा खेळ करायचा, या मानसिकतेच बदल करण्याची गरज आहे. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध पॉवरप्लेमध्ये पुरेशा धावा करणे आवश्यक असल्याचे मत गावसकर यांना मांडले.

Gavaskar
नामिबिया विरुद्ध रोहितनं घातली विक्रमाला गवसणी

क्षेत्ररक्षणावरही टीका

भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते, अशी टीका गावसकर यांनी केली आणि न्यझीलंड संघाचे उदाहरण दिले. न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षक केवळ धावाच अडवत नव्हते, तर कठीण झेलही पकडत होते. धावचीत करण्यातही ते अग्रेसर होते. कधी कधी गोलंदाजी प्रभावहीन ठरत असली आणि खेळपट्टी साथ देत नसली, तरी चपळ क्षेत्ररक्षण सामन्याचे चित्र पालटू शकते. असे गावसकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.