West Indies vs Afghanistan T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या शेवटच्या साखळी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानचा 104 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 16.2 षटकांत 114 धावांवरच ऑलआऊट झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील धावांच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. 22 धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला असला तरी त्यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि निकोलस पूरन यांनी दुसऱ्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी केली. जॉन्सन चार्ल्सने 27 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.
या सामन्यात निकोलस पुरनने तुफानी खेळी खेळली. त्याने 53 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 98 धावा केल्या. निकोलस पूरनची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मात्र, त्याचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले आणि तो धावबाद झाला. पण वेस्ट इंडिजला 218 धावा करता आल्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला अफगाणिस्तान संघ या सामन्यात कधीच दिसला नाही. त्यांना सर्वात मोठा धक्का पहिल्याच षटकात बसला. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. या धावांचा पाठलाग करण्याची जबाबदारी पूर्णपणे गुरबाजच्या खांद्यावर होती.
मात्र, तो आऊट होताच सामना पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या हातात गेला. इब्राहिम झद्रानने नक्कीच 28 चेंडूत 38 धावा केल्या पण त्याला उर्वरित फलंदाजांची साथ मिळाली नाही आणि संपूर्ण संघ 114 धावांवर ऑलआऊट झाला , ओबेद मॅकॉयने 3 षटकात 14 धावा देत 3 बळी घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.