आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्न

न्यूझीलंड संघाने रविवारी अफगाणिस्तानला धूळ चारत टी़-२० विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी रुबाबात गाठली आणि भारतीय संघाचे प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून पॅकअप झाले
आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्न
आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्नsakal media
Updated on

नवी दिल्ली : न्यूझीलंड संघाने रविवारी अफगाणिस्तानला धूळ चारत टी़-२० विश्‍वकरंडक स्पर्धेची उपांत्य फेरी रुबाबात गाठली आणि भारतीय संघाचे प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून पॅकअप झाले. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदनलाल यांनी भारतीय संघावर निशाणा साधला आहे.

आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्न
T20 World Cup : पुरेशा धावा केल्या नाही, हेच खरे कारण

भारतीय खेळाडूंनी कशाला प्राधान्य द्यायचे हे ठरवायला हवे. आयपीएल आणि विश्वकरंडक यांच्यामध्ये महत्त्वाचे काय, याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यायला हवा, असे मदनलाल यांनी म्हटले आहे. मदनलाल पुढे म्हणाले, भारतीय संघ जुलै महिन्यापासून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत होता. त्यानंतर हेच खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले. यानंतर थेट हे सर्व खेळाडू टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झाले. या कालावधीत भारतीय क्रिकेटपटू जास्त प्रमाणात क्रिकेट खेळले. भारतीयांना जैवसुरक्षा वातावरणात राहावे लागले. टी- २० करंडकाअगोदर भारतीय खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळायला हवी होती, अशीही खंत मदनलाल यांनी पुढे व्यक्त केली.

आयपीएल की विश्वकरंडक ! माजी अष्टपैलू मदनलाल यांचा प्रश्न
२४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान क्रिकेट दौऱ्यावर

... म्हणून पाक, इंग्लंडची प्रगती

पाकिस्तान व इंग्लंड या संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित कामगिरी केली आहे. या संघांतील खेळाडू टी-२० विश्वकरंडक स्पर्धेअगोदर जास्त प्रमाणात क्रिकेट खेळले नाहीत. त्यामुळे या महत्त्वाच्या स्पर्धेआधी या दोन्ही संघांतील खेळाडू ताजेतवाने राहिले. यामुळे या दोन्ही संघांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली, असेही मदनलाल यावेळी आवर्जून म्हणाले. भारताच्या तुलनेत न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण अफलातून होते असे मदनलाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.