Arun Kanade: ड्रायव्हर ते टीम इंडियाची ड्रेसिंग रुम... विधान भवनात सत्कार झालेले अरुण कानाडे आहेत तरी कोण?

T20 World Cup 2024 Winning Team India Support Staff: टी२० वर्ल्ड कप विजेत्या महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण कानाडे यांचेही कौतुक करण्यात आले.
Arun Kanade | Team India
Arun Kanade | Team India Sakal

Who is Arun Kanade: भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. यानंतर भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) मायदेशी परतले.

गुरुवारी भारतीय संघाचा दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरव करण्यात आला, तर मुंबईत मरिन ड्राईव्हला ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान, यानंतर शुक्रावारी महाराष्ट्र शासनाकडूनही टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल या खेळाडूंबरोबर गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू पारस म्हाम्ब्रे आणि मसाज थेरपिस्ट अरुण कानाडे यांचाही समावेश आहे.

Arun Kanade | Team India
Team India: 'वेडेपणा...!' चाहत्यांची गर्दी पाहून मुंबईचा राजा रोहितही गहिवरला, BCCI ने शेअर केला ओपन बसमधील Video

दरम्यान, अनेकांसाठी अरुण कानाडे हे नाव नवीन असेल. मात्र, भारतीय संघासाठी हे नाव नवे नाही. कारण जवळपास ९ वर्षांपासून ते भारतीय संघाशी जोडलेले आहेत. सामन्यावेळी किंवा सरावावेळी खेळाडूंना मसाज देण्याचं महत्त्वाचं काम ते करतात.

मुळचे कळंबचे असलेले अरुण कानाडे हे २०१५ मध्ये रमेश माने यांच्या जागेवर भारतीय संघात सामील झाले होते. रमेश माने हे माने काका या नावाने प्रसिद्ध होते आणि त्यांनी जवळपास एक दशक भारतीय संघाबरोबर काम केले होते.

त्यामुळे त्यांची जागा भरून काढण्याचं मोठं काम अरुण कानाडे यांना करायचं होतं. ते त्यांनी चोख केल्याचं गेल्या अनेक वर्षात दिसून आलं आहे. त्यांचे भारतीय संघातील खेळाडूंबरोबर अगदी खेळीमेळीचे नाते निर्माण झालेले आहे. त्यातही विराटशीही त्यांचे खास बाँडिंग आहे.

Arun Kanade | Team India
Team India Victory Parade: "थँक्य यू मुंबई पोलीस!" विजयी मिरवणूकीनंतर विराट-जडेजाने 'रिअल हिरोंचे' मानले आभार; पाहा पोस्ट

मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. आधी परळमधील चाळीत रहायचे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यामुळे मसाज थेरपिस्ट होण्यापूर्वी ते टेम्पो ड्रायव्हर म्हणून काम करायचे.

जवळपास ५ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केल्यानंतर वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचं भान राखत त्यांनी स्वीडीश मसाजचे ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्यांच्या मित्रानं त्यांना सल्ला दिला होता. मात्र, कुटुंबाचा याला आधी विरोध होता, पण पत्नीनं साथ दिल्यानं त्यांनी दादरमधून ३ महिन्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलं. सुरुवातीला चाळीतील लोकांवरच त्यांनी मसाजचा सराव चालू केला.

हळुहळू या क्षेत्रात त्यांनी जम बसवला. त्यानंतर क्रिकेट विश्वात त्यांनी पाऊल टाकलं. मुंबईच्या रणजी खेळाडूंना ते मसाज द्यायला लागले. याचदरम्यान २०११ ला त्यांना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मसाज देण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांच्यासाठी आयुष्याला वळण देणारी ठरली.

Arun Kanade | Team India
T20 World Cup 2024: सूर्याने कॅच घेण्यापूर्वी षटकार समजून रोहित झालेला हताश? फायलनमधील Video व्हायरल

त्यांच्या क्लायंट लिस्टमध्ये देशातील प्रसिद्ध उद्योजक तसेच रिकी पाँटिंग, कायरन पोलार्ड, विराट कोहली यांच्यासह काही बॉलिवूड कलाकारही जोडले गेले.आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाबरोबरही मसाज थेरपिस्ट म्हणून काम केले. यानंतर त्यांचा प्रवेश भारतीय संघात झाला आणि आता ते गेल्या अनेक वर्षापासून भारतीय संघासह आहेत.

अरुण हे टी२० वर्ल्ड कप २०२४ दरम्यान देखील भारतीय संघाबरोबर होते आणि भारतीय खेळाडू तंदुरुस्त राहतील याकडेही त्यांनी लक्ष दिले होते. ते फक्त मसाज थेरपिस्ट म्हणूनच नाही, तर एक चांगले व्यक्ती म्हणूनही आसपासच्या लोकांमध्ये बरेच परिचीत आहेत.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com