T20 WC : भारताच्या जावायाच्या जोरावर स्कॉटलंडसमोरही पाकिस्तानचा थाट

पाकिस्तानने पहिल्या गटातील संघांपेक्षा वरचढ कामगिरी करुन दाखवत स्पर्धेतील विजेतेपदासाठीची आपली दावेदारी पक्की केलीय.
Pakistan VS Scotland
Pakistan VS Scotland Twitter
Updated on

टीम इंडिया विरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील ऐतिहासिक कामगिरीनंतर विजयी धडाका कायम ठेवत पाकिस्तान संघाने सुपर 12 मध्ये अव्वल होण्याचा मान मिळवला आहे. टीम इंडियानंतर न्यूझीलंड संघाला पराभूत करत पाकिस्तानने सेमी फायनल पक्की केली होती. सुपर 12 मधील दुसऱ्या गटातील आपल्या अखेरच्या लढतीत त्यांनी स्कॉटलंडला पराभूत केले. पाच सामन्यातील प्रत्येक सामना जिंकत त्यांनी ग्रुपमध्येच नव्हे तर पहिल्या गटातील संघापेक्षा वरचढ कामगिरी करुन दाखवत स्पर्धेतील विजेतेपदासाठीची आपली दावेदारी पक्की केलीय.

स्कॉटलंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या जोडीनं पाकिस्तान संघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 35 धावा असताना हम्झा ताहिरनं मोहम्मद रिझवानला 15 धावांवर चालते केले. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या फखर झमानलाही क्रिस ग्रिव्जने स्वस्तात माघारी धाडले. स्कॉटलंड संघाने पाकिस्तानची अवस्था 2 बाद 59 अशी केली होती.

Pakistan VS Scotland
भारताचं 'पॅक-अप', न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये; अफगाणिस्तानही बाहेर

हाफिज 31 धावा करुन माघारी फिरल्यावर बाबर आझम आणि शोएब मलिक या जोडीनं सघाच्या डावाला आकार दिला. बाबर आझमने 47 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 66 धावा केल्या. शोएब मलिकनं 18 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी साकारली. आपल्या खेळीत त्याने 1 चौकार आणि 6 षटकार खेचले. दुसऱ्या बाजूला असिफ अली 4 चेंडूत 5 धावा करुन नाबाद राहिला. शोएबच्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानी संघाने निर्धारित 20 षटकात 189 धावा केल्या होत्या.

Pakistan VS Scotland
‘भाईनच भावाची लावली ना’; सेमिफायनल प्रवेश हुकल्यावर ‘मिम्स’

या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या संघाने सावध सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर 23 धावा असताना हसन अलीने स्कॉटलंडच्या कर्णधाराला माघारी धाडले. कायले कोएत्झरने 16 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. सलामीवीर जॉर्ज मुन्सीने मारलेला स्टेट ड्राइव्ह वासीम इमानच्या हाताला स्पर्श करुन स्टम्पवर आदळला आणि मॅथ्यू क्रॉसच्या इनिंगचा दि एन्ड झाला. मुन्सी 17 धावांची खेली करुन परतला. स्कॉटलंडकडून रिचे बेरिंग्टंन याने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. डायलनला शदाब खानने खातेही उघडू दिले नाही. मायकल लीसच्या रुपात शाहीन आफ्रिदीला एकमेव यश मिळाले. स्कॉटलंडचा संघ निर्धारित 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्या 117 धावांपर्यंत मजल मारु शकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.