David Warner Apology Post: क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव करुन ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर याची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
यामध्ये त्यानं चक्क भारतीयांची माफी मागितली आहे. पण त्यानं काय माफी मागितली याचं कारण खूपच खास आहे. (World Cup Final David Warner apologises to Fan For Breaking Billions Of Hearts after Australia Win vs India)
भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत. जास्त करुन भारतीय चाहते पराभवानंतर आपल्या टीमला प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. त्यातच डेव्हिड वॉर्नरला एका भारतीय चाहत्यानं टॅग करत लिहिलं की, वॉर्नर तू करोडो भारतीयांना नाराज केलं आहे. (Latest Marathi News)
त्यानंतर या पोस्टला चक्क वॉर्नरनं उत्तर दिलं. यात तो म्हणतो, मी तुमची माफी मागतो. हा खरंच चांगला खेळ होता, तसेच स्टेडियममधलं वातावरण पाहण्यासारखं होतं. आपल्या सर्वांचे धन्यवाद. (Latest Marathi News)
वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ६ विकेट्सनं पराभवाचा सामना करावा लागला. भारतानं शेवटचा वर्ल्डकप २०११ मध्ये जिंकला होता. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं हा वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर धोनीच्याच नेतृत्वाखाली २०१३ मध्ये भारतानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर आजवर आयसीसीची कुठलीही ट्रॉफी भारतीय संघानं जिंकलेली नाही. (Marathi Tajya Batmya)
पन्नास षटकांच्या वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतर आता भारताचं लक्ष्य हे २०२४ मध्ये होणाऱ्या टी २० वर्ल्डकपकडे असेल. अमेरिका आणि वेस्टइंडीज संयुक्तरित्या याचं आयोजन करणार आहे. आता हा कप जिंकण्याकडं भारताचं लक्ष्य असेल.
या स्पर्धेसाठी कॉलिफाय झालेले संघ असे - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, युके, वेस्टइंडीज. रॉबिन फॉर्मेटमध्येच हा वर्ल्डकप खेळला जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.