T20 World Cup 2024: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) मायदेशात पोहचला. यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
शुक्रवारी संध्याकाळी भारतीय संघातील कर्णधार रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल हे मुंबईचे क्रिकेटपटू वर्षा बंगल्यावर आले होते. तिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शाल, गणेश मुर्ती, पुष्पगुच्छ देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात आला. दरम्यान, जैस्वालला जेव्हा शाल घातली, तेव्हा त्याने आधी वाकून शिंदे यांना नमस्कार केला. त्याचा हा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार या चारही खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी १ कोटी बक्षीस दिले जाणार आहे. तथापि, यादरम्यान भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू पारस म्हाम्ब्रे यांचाही सत्कार करण्यात आला.
गुरुवारी मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघाने सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर संध्याकाळी भारतीय संघ मुंबईत पोहचला.
मुंबईत आल्यानंतर नरिमन पाँइंट्स ते वानखेडे स्टेडियमदरम्यान विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे. यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा बीसीसीआयकडून सत्कार करण्यात आला. बीसीसीआयने भारतीय संघाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.