9 sixes, 13 fours : त्रिशतकानंतरही BCCI ने ज्याला बाहेर केले, त्या पठ्ठ्याने ट्वेंटी-२०त वेगवान शतक ठोकले

Karun Nair century: आयपीएल लिलावात अनसोल्ड गेला, कसोटीत त्रिशतक झळकावल्यानंतरही बाहेरचा रस्ता दाखवला गेला. पण, राजस्थान रॉयल्सच्या माजी फलंदाजाने कमबॅकचे प्रयत्न थांबवलेले नाही.
Karun Nair
Karun Nairesakal
Updated on

Karun Nair Century in Maharaj T20 Trophy: राजस्थान रॉयल्सचा माजी फलंदाज करुण नायर याने महाराजा ट्वेंटी-२० ट्रॉफी स्पर्धेत खणखणीत शतक झळकावले. मैसूर वॉरियर्सच्या कर्णधाराने ९ षटकार व १३ चौकारांची आतषबाजी करून १२४ धावांची नाबाद खेळी केली. मंगलोर ड्रॅगन्सविरुद्ध त्याने ४८ चेंडूंत ही अविश्वसनीय खेळी केली आणि आयपीएल २०२५ च्या ऑक्शनपूर्वी फ्रँचायझींचे लक्ष वेधले.

नायरला इंग्लंडविरुद्ध कसोटीत त्रिशतक झळकावल्यानंतरही संघाबाहेर बसवले गेले होते. त्यानंतर अनेक युवा खेळाडूंनी कसोटी संघात पदार्पण केले. नायरसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले असे वाटत असताना तो सातत्याने दमदार कामगिरी करून पुनरागमनासाठी प्रयत्न करताना दिसतोय. महाराजा ट्रॉफी ट्वेंटी-२०त ड्रॅगन्सचा कर्णधार श्रेयस गोपाळने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या षटकात नायर फलंदाजीला आला आणि त्याने पाचव्या षटकात पहिला षटकार टोलवला. त्यानंतर मधल्या षटकांत फटकेबाजी करून त्याने २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

Karun Nair
Yuvraj Singh चा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; T20I मध्ये एका षटकात चोपल्या गेल्या ३९ धावा

नायरची फटकेबाजी अशीच सुरू राहिली आणि त्याने ४३ चेंडूंत शतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात त्याने समर्थ नागराजने टाकलेले दोन चेंडू स्टेडियममध्ये पाठवले. त्याच्या या फटकेबाजीने वॉरियर्स संघाने ४ बाद २२६ धावांचा डोंगर उभा केला. मनोज भंडागेने १४ चेंडूंत ३१ धावांचे योगदान दिले.

पावसाने बाधित झालेला हा सामना वॉरियर्सने VJD प्रणालीनुसार २७ धावांनी जिंकला. ड्रॅगन्सला १४ षटकांत ७ बाद १३८ धावा करता आल्या. कृष्णमुर्ती सिद्धार्थाने २७ चेंडूंत ५० धावा केल्या.

आयपीएलमध्ये दुर्लक्षित

आयपीएल २०२३च्या ऑक्शनमध्ये ५० लाखांची मुळ किंमत असूनही नायरवर कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केले नाही. राजस्थान रॉयल्सकडून तो २०२२ मध्ये शेवटचा खेळला होता. नायरने आतापर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताचा दिल्ली कॅपिटल्स), किंग्स इलेव्हन पंजाब ( आताचा पंजाब किंग्स), कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाकडून खेळला आहे. त्याने ७६ आयपीएल सामन्यांत ११७१ धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.