ICC Chairman Jay shah vs PCB : BCCI चे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आयसीसीच्या १६ सदस्यांपैकी १५ जणांनी जय शाह यांना पाठिंबा दर्शविल्याने त्यांच्या विरोधात या पदासाठी कुणीच अर्ज भरला नाही. १ डिसेंबर २०२४ मध्ये जय शाह अध्यक्षपदाची सूत्र हाती घेणार आहेत.
३५ वर्षीय जय शाह हे ICC चे नेतृत्व करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर आयसीसीचे नेतृत्व करणारे ते भारतातील पाचवे व्यक्ती आहेत. जय शाह म्हणाले, “आम्ही जे शिकलो त्यावरून आम्ही नवीन विचार आणि नवकल्पना स्वीकारली पाहिजे. लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिेकेटचा समावेश आहे आणि हा क्रिकेटच्या वाढीची ही संधी आहे."
जय शाह यांची बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांना १६ पैकी १ मत कमीच पडले आणि हे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे असल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) मुक प्रेक्षक राहणे पसंत केले.
"पीसीबीकडून कोणताही शब्द आलेला नाही. शाह यांना सदस्यांचा जबरदस्त पाठिंबा असल्याने त्याची गरज होती असे नाही, परंतु पाकिस्तान बोर्डाने संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रेक्षकांची भूमिका बजावणे पसंत केले," असे एका सूत्राने सांगितले.
जय शाह यांच्यासमोर पहिलीच टाक्स ही चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या यशस्वी आयोजनाची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे आणि भारताचा तेथे खेळण्यास जाणार विरोध आहे. अशात BCCI ने आशिया चषक २०२३ प्रमाणे हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला आहे. आता जय शाहच अध्यक्ष झाल्याने PCB चं टेंशन वाढणे साहजिक आहे. भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत खेळवले जावे, अशी बीसीसीआयची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.