किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

IND vs BAN 2nd Test: भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला.
virat kohli
virat kohliesakal
Updated on

Fifteen Years old Fan of Virat Kohli: क्रिकेटपटू आणि चाहते यांचे अनोखे किस्से नेहमीच आपल्याला ऐकायला व पाहायला मिळतात. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान घडलेला विराट कोहलीच्या चाहत्याचा एक असाच अनोखा किस्सा समोर येत आहे. या १५ वर्षीय चाहत्याच्या 'विराट'प्रेमाने सर्वांनाच अचंबित केले आहे.

विराट कोहली हा एक स्टार भारतीय खेळाडू असून त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यामुळे जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर तब्बल २७ करोड फॉलोवर्स आहेत. सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोवर्स असलेल्या खेळाडूंच्या यादीत तो भारतात पहिल्या, तर जगात रोनाल्डो, मेस्सीनंतर तिसऱ्या स्थानी आहे.

virat kohli
IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... BCCI ची मोठी घोषणा, बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय

सध्या बांगलादेश संघ २ कसोटी व ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. भारत-बांगलादेश दरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नई येथे झाला व त्यात भारताने बाजी मारली. दुसरा सामना कानपूर येथे सुरू आहे. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी घडलेला एक अनोखा किस्सा समोर येत आहे.

झाले असे की, एका १५ वर्षीय शाळकरी मुलाने भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीला पाहण्यासाठी तब्बल ७ तासांचा सायकल प्रवास केला आहे. कार्तिकेय नावाच्या या मुलाने विराट कोहलीचा खेळ अनुभवायला ५८ किलोमीटर अंतर सायकलने पार केले. उन्नाववरून पहाटे ४ वाजता निघालेला कार्तिकेय कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सकाळी ११ वाजता पोहचला. १५ वर्षीय मुलाचे हे 'विराट'प्रेम पाहून सर्वच अचंबित झाले आहेत.

दुसऱ्या कासोटीतील पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावली त्यामुळे खेळ उशिरा सुरू झाला. खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशने ३५ षटकांमध्ये ३ विकेट्स गमावत १०७ धावा पूर्ण केल्या. परंतु नंतर जोरदार पावसामुळे खेळ थांबवावा लागला. आज दुसऱ्या दिवशी देखील पावसामुळे खेळ रद्द करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.