MS Dhoni की एबी डिव्हिलियर्स? कारकीर्दिची १६ वर्षे अन् १६ कठीण प्रश्न! Virat Kohli ची भन्नाट उत्तरं

Virat Kohli 16 years : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केली. कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.
MS Dhoni की एबी डिव्हिलियर्स? कारकीर्दिची १६ वर्षे अन् १६ कठीण प्रश्न! Virat Kohli ची भन्नाट उत्तरं
Updated on

Virat Kohli 16 years in international cricekt: जगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दिला आज १६ वर्ष पूर्ण झाली आहेत. १८ ऑगस्ट २००८ मध्ये पदार्पण करणारा चिकू ते २०२४ चा किंग कोहली... हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. विराटला पदार्पणाच्या सामन्यात फक्त १२ धावा करता आल्या होत्या, परंतु आज त्याच्या नावावर क्रिकेटमधील बरेचसे विक्रम नोंदवले गेले आहेत. विराटच्या या १६ वर्षांच्या कारकीर्दिच्या निमित्ताने स्टार स्पोट्सने एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विराटला १६ अवघड प्रश्न विचारले गेले आहेत...

विराट कोहलीने आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. महेंद्रसिंग धोनीनंतर टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा मान विराटला मिळाला होता. विराटने त्याच्या कारकीर्दित २०११चा वन डे वर्ल्ड कप, २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याचे फॅन फॉलोअर्सही भरपूर आहेत आणि जगभरात त्याच्या नावाचा डंका आहे.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( १०००) नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या ( ८०) नावावर आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये ५० शतकं झळकावून सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरचा ( ४९) विक्रम मोडला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहा वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला होता. विराट चौथ्या क्रमांवार सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल आहे.

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ७ द्विशतकं झळकावली आहेत आणि यासह त्याने वॅली हॅमंड व माहेला जयवर्धने यांची बरोबरी केली आहे. याशिवाय ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो चौथा भारतीय आणि जगातील नववा खेळाडू आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ विजयानंतर विराटने ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराटच्या या यशाचे सेलिब्रेशन करण्यात येत आहे आणि त्याला १६ अवघड प्रश्न विचारले गेले आहे. पाहा मजेशीर व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.