Youngest centurion in women's cricket : अमेरिकेचा महिला क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे आणि त्यांनी पाचव्या वन डे सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. झिम्बाब्वेच्या ६ बाद २४६ धावांचा यशस्वी पाठलाग अमेरिकेच्या महिला संघाने ४४.२ षटकांत ३ बाद २४९ धावा करून केला. या सामन्यात १६ वर्षाची चेतना पगीद्याला ( Chetna Pagydyala ) चमकली. तिने पदार्पणाच्या वन डे सामन्यात १५२ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने १३६ धावांची खेळी केली. तिने चौकारांनीच ७२ धावा केल्या आणि अमेरिकेच्या महिला संघाकडून हा मोठा विक्रम आहे. यापूर्वी दिशा ढिंग्राने ३२ धावा चौकारांनी केल्या होत्या. अमेरिकेच्या महिला संघाकडून वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी चेतना ही पहिलीच खेळाडू ठरली. यापूर्वी श्रीहर्षाच्या ६९ धावा ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती.