Farhan Ahmed: १६ वर्षीय गोलंदाज फरहान अहमद कौंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण सामन्यात सरे संघाविरुद्ध सात विकेट घेऊन विक्रमाला गवसणी घातली. पदार्पणात एका डावात सर्वाधिक विकेट घेणारा तो युवा खेळाडू ठरला आहे. त्याचा भाऊ रेहान अहमद हा इंग्लंडच्या कसोटी संघाकडून खेळतोय आणि पाकिस्तानविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या आणि तो कसोटी मध्ये पदार्पणात सर्वाधिक विकेट घेणारा तो युवा खेळाडू ठरला होता. फरहान अहमदने त्याच्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
नॉटिंगहॅमशायर संघामधून खेळणाऱ्या फिरकी गोलंदाज फरहानने एका डावामध्ये ७ विकेट घेत सरे संघाला ५२५ धावांवर रोखले. यामध्ये त्याने भारतीय फलंदाज साई सुदर्शन याला देखील माघारी पाठवले. सुदर्शनने १७८ चेंडूंमध्ये १०५ धावांची खेळी केली होती. सुदर्शन व्यतिरिक्त फरहानने रॉरी बर्न्स, रियन पटेल, विल जॅक्स, बेन फोक्स, टॉम लॉ, कॉनर मकर या खेळाडूंनाही माघारी पाठवले.
नॉटिंगहॅमशायरकडून पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या विक्रमापासून फरहान एका विकेटने वंचित राहिला आहे. कारण हा विक्रम अजूनही लॉर्ड्सवर एमसीसी विरुद्ध ९१ धावांत ८ विकेट घेणारा वेगवान गोलंदाज फ्रेड बॅरटच्या नावावर आहे. असे असले तरी १६ वर्षीय खेळाडूने पदार्पणात ७ विकेट घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे.
फरहान अहमद हा पाकिस्तानी माजी खेळाडू नईम अहमद यांचा मुलगा आहे. फरहानचा मोठा भाऊ रेहान अहमद इंग्लंड संघाचा खेळाडू आहे. फरहान हा उजव्या हाताचा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज असून तो नॉटिंगहॅमशायर कौंटी क्रिकेट क्लब, इंग्लंड १९ वर्षाखालील क्रिकेट संघ आणि इंग्लंड लायन्सकडून खेळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.