Duleep Trophy 2024: १९ वर्षीय पोरानं Rishabh Pant च्या संघाची लाज वाचवली; खणखणीत सेंच्युरी ठोकली

Musheer Khan Century: दुलीप ट्रॉफी २०२४ चा पहिला दिवस गावजवला तो मुंबईच्या १९ वर्षीय मुशीर खान याने... भारत ब संघाचा डाव त्याने एकहाती सावरला...
Musheer khan
Musheer khanesakal
Updated on

Duleep Trophy 2024 Musheer Khan: भारताच्या कसोटी संघात स्थान पटकावू पाहणाऱ्या सीनियर्स खेळाडूंना दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अपयश आलेले पाहायला मिळाले. श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी निराश केले. तेच मुंबईच्या १९ वर्षीय मुशीर खानने खणखणीत शतक झळकावून भारत ब संघाचा डाव सावरला. त्याच्या शतकामुळे ७ बाद ९४ वरून संघाने २०२ धावांपर्यंत मजल मारली. नवदीप सैनीने त्याला चांगली साथ दिली आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या भारत ब संघाला यशस्वी जैस्वाल ( ३०) व कर्णधार अभिमन्यू इश्वरन ( १३) यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. आवेश खानने पहिला धक्का दिला. सर्फराज खानही ९ धावा करून बाद झाला. ५९ चेंडूंत ६ चौकारांसह ३० धावा करणाऱ्या यशस्वीला खलिल अहमदने माघारी पाठवले.

Musheer khan
Duleep Trophy 2024: टीम इंडियात एन्ट्री घेऊ पाहणारा स्टार फलंदाज फेल, निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; रोहितची चिंता वाढली

ऋषभ पंत १० चेंडूंत ७ धावा करून परतला. नितिश कुमार रेड्डीही भोपळा न फोडताच आकाश दीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मुशीरने नवदीप सैनीला सोबतीला घेऊन संघाला ७९ षटकांत ७ बाद २०२ धावांपर्यंत पोहोचवले आहे. मुशीरने २२७ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह नाबाद १०५ धावा केल्या आहेत. नवदीन २९ धावांवर खेळतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.