१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर; पत्नीचे निधन

भारताच्या १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या कीर्ती आझाद यांच्यावर सोमवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
kirtiazad
kirtiazadesakal
Updated on

Kirti Azad : भारताच्या १९८३ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या कीर्ती आझाद यांच्यावर सोमवारी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पत्नी पूनम यांचे निधन झाले. "माझी पत्नी, पूनम आता आमच्यात नाही. दुपारी १२:४० वाजता तिच्या स्वर्गीय प्रवासासाठी निघाली," असे आझाद यांनी X वर पोस्ट लिहीली.

आझाद हे वर्धमान-दुर्गापूरचे तृणमूल काँग्रेसचे खासदारही आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही कीर्ती आझाद यांच्या पत्नीच्या मृत्यूवर श्रंद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या की,"आमच्या खासदार आणि वर्ल्ड कप विजेत्या क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांनी अखेरचा श्वास घेतला हे जाणून दुःख झाले. मी पूनमला ओळखते. ती गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराशी लढत होती.''

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.