आयुष बदोनी व प्रियांश आर्य या युवा फलंदाजांनी दिल्ली प्रीमिअर लीग २०२४ ची आजची मॅच गाजवली. दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स या सामन्यात ट्वेंटी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रमाची नोंद झाली. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण दिल्ली संघाकडून ३१ चौकार व १९ चौकार लगावले गेले आणि २० षटकांत त्यांनी ५ बाद ३०८ धावांचा डोंगर उभा केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम सांघिक धावसंख्या आहे.
प्रियांश व सार्थक रे सलामीला आले, परंतु रे ११ धावा करून माघारी परतला. त्यानंतर प्रियांश व आयुष य दोघांनी उत्तर दिल्लीच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. या दोघांनी २८६ धावांची भागीदारी केली, जी ट्वेंटी-२०तील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. या सामन्यात एकूण ३१ षटकार खेचले गेले.
प्रियांशने ५० चेंडूंत १० चौकार व १० षटकारांच्या मदतीने १२० धावांची वादळी खेळी केली. आयुष बदोनीनेही या सामन्यात ५५ चेंडूंत ८ चौकार व १९ षटकारांच्या मदतीने १६५ धावा चोपल्या आणि संघाला २० षटकांत ५ बाद ३०८ धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण दिल्लीच्या या धावसंख्येने इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबादचा ३ बाद २८७ धावांचा विक्रम मोडला.
नेपाळ - ३ बाद ३१४ वि. मंगोलिया, २७ सप्टेंबर २०२३
दक्षिण दिल्ली - ५ बाद ३०८ वि. उत्तर दिली, ३१ ऑगस्ट २०२४
सनरायझर्स हैदराबाद - ३ बाद २८७ वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, १५ एप्रिल २०२४
अफगाणिस्तान - ३ बाद २७८ वि. आयर्लंड, २३ फेब्रुवारी २०१
झेक प्रजासत्ताक - ४ बाद २७८ वि. टर्की, ३० ऑगस्ट २०१९
एका डावात सर्वाधिक ३१ षटकाराचा विक्रम आज दक्षिण दिल्ली संघाच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी हा विक्रम नेपाळ ( २६ वि. मंगोलिया) संघाच्या नावावर होता. पंजाब किंग्सने आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध दुसऱ्या डावात २४ षटकार खेचले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.