most runs from one over : आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मंगळवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. T20 World Cup Sub Regional East Asia-Pacific Qualifier A स्पर्धेत ऐतिहासिक फटकेबाजी पाहायला मिळाली. फलंदाज डॅरिअस व्हिसरने समोआ ( Samoa) संघासाठी ( Darius Visser) आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर केला.
व्हानुआतूचा गोलंदाज नॅलिन निपिकोच्या षटकातत व्हिसरने सहा षटकार खेचले आणि त्याला ३ नो बॉलचीही मदत मिळाली. त्यामुळे एका षटकात ३९ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड सामोआ संघाच्या नावावर नोंदवला गेला. सामन्याच्या १५व्या षटकात हा विक्रम झाला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० ( पुरुष) सामन्यात एका षटकात सर्वाधिक ३९ धावांचा विक्रम या सामन्यात नोंदवला गेला. यामुळे भारताच्या युवराज सिंगच्या नावावर असलेला ३६ धावांचा युवराज सिंगचा विक्रम तुटला. युवीने २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा खणखणीत षटकार खेचून ३६ धावा कुटल्या होत्या. २०२१मध्ये किरॉन पोलार्ड, २०२४ मध्ये निकोलस पुरन, दिपेंद्र सिंग एैरी आणि रोहित शर्मा/रिंकू सिंग ( २०२४) यांनीही असाच पराक्रम केला होता.
व्हिसेरने पहिल्या तीन चेंडूत षटकार खेचले आणि चौथ्या चेंडू नो बॉल टाकला गेला. त्यानंतर फ्री हिटवर षटकार खेचला गेला. पाचवा चेंडू निर्धाव राहिला. सहावा चेंडू नो बॉल राहिला आणि पुन्हा एका नो बॉलवर व्हिसेरने षटकार खेचला. त्यानंतर शेवटच्या लिगल चेंडूवर षटकार खेचून एका षटकात ३९ धावांचा विक्रम त्याने नोंदवला.
व्हिसेरने या सामन्यात १४ षटकार व ५ चौकार खेचले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यातील हे सर्वाधिक षटकार ठरले. व्हिसेर ६२ चेंडूंत १३२ धावांवर बाद झाला. त्याच्या या खेळीने समोआ संघाने दुसऱ्या विजयाची नोंद करताना २०२६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. सामोआच्या १७४ धावांच्या प्रत्युत्तरात व्हानुआतू संघाला ९ बाद १६४ धावा करता आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.