South Africa vs West Indies 2nd Test : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची २५ वर्षांची अपराजित मालिका कायम राखली आहे. आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत ४० धावांनी विजय मिळवून मालिका १-० अशी जिंकली. आफ्रिका व विंडीज यांच्यातली दुसरी कसोटी ३ दिवसांत संपली आणि दोन्ही संघांच्या मिळून एकूण ४० विकेट्स पडल्या. कसोटीच्या पहिल्या दिवशीच १७ विकेट्स पडल्या होत्या. गोलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या सामन्यात विंडीजच्या २२ वर्षीय जेडन सिल्सने ९ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेने सलग १० कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ मधील हा त्यांचा दुसरा विजय ठरला. या कसोटी मालिकेत केशव महाराजने सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्याने त्याला मॅन ऑफ दी सीरिजचा मान मिळाला. वेस्ट इंडिजच्या सिल्सने या मालिकेत १२ विकेट्स घेतल्या आहेत.
विंडीजच्या गोलंदाजांनी आफ्रिकेचा पहिला डाव १६० धावांत गुंडाळला. शामर जोसेफने ३३ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर सिल्सने ३ बळी टिपले. पण, आफ्रिकन गोलंदाजांनी विंडीजला आघाडी मिळवू दिली नाही. जेसन होल्डरच्या नाबाद ५४ धावांनंतरही विंडीजला १४४ धावाच करता आल्या. वियान मल्डरने ४, नांद्रे बर्गरने ३, तर केशव महाराजने २ विकेट्स घेतल्या.
आफ्रिकेने दुसऱ्या डावात २४६ धावा केल्या. एडन मार्करम व कायले वेरेयन्ने यांच्या अर्धशतकाला टोनी डी जॉर्जी ( ३९), मल्डर (३१) यांची साथ मिळाली. जेडन सिल्सने सहा विकेट्स घेतल्या. २६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विडींजचा डाव २२२ धावांवर गडगडला आणि आफ्रिकेने ४० धावांनी विजय मिळवला. गुदाकेश मोतीने ४५ धावांची खेळी केली. आफ्रिकेच्या रबाडा व महाराज यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका १६० ( पिएड्त ३८*, बेडिंगहॅम २८; जोसेफ ५-३३, सिल्स ३-४५) आणि २४६ ( वेरेयन्ने ५९, मार्करम ५१; सिल्स ६-६१) विजयी वि. वेस्ट इंडिज १४४ ( जेसन होल्डर ५४*; मल्डर ४-३२, बर्गर ३-४९) आणि २२२( मोती ४५; महाराज ३-३७, रबाडा ३-५०).
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.